पुणे

काळेवाडीत महसूल तक्रारींच्या निराकरणासाठी उपक्रम

CD

गराडे, ता. ४ : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हा लोकाभिमुख उपक्रम शासनाकडून सुरू केला आहे. हे अभियान नागरिकांच्या महसूल संबंधित तक्रारी व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राबवले जात आहे. काळेवाडी येथे या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्‍घाटन आमदार विजय शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आले.
या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाशी निगडित प्रश्‍न निकाली काढून यात शेतकरी बांधवांसाठी ७/१२ उतारा दुरुस्ती, फेरफार नोंदी, वारस नोंद, जाती, उत्पन्न, रहिवासी दाखले, जुने दस्त नोंदवही व पडताळणी, मालमत्ता नोंदणी, जमिनीचे वर्गीकरण व मोजणी यांसह विविध योजनांचे लाभ, दाखले नागरिकांना घेतले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून प्रातिनिधिक स्वरूपात प्रदान केले. यात ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत स्वयं सहायता गट धनादेश वाटप, वय, राष्ट्रीयत्व, अधिवास दाखले, उत्पन्न दाखले, गोल्डन कार्ड, महिलांना बेबी केअर किट, आभा कार्ड, डीबीटी लाभ, कुपोषित आहार किट, संगणक संच, शेततळे अस्तरीकरण लाभ, कर्जमुक्ती दाखले, स्व.गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना लाभ, फळपीक विमा, रोटाव्हेटर पेरणी यंत्र, नांगरणी यंत्र, ट्रॅक्टर वाटप, घरकुल लाभ, सिंचन विहीर लाभ, वृक्ष लागवड, लखपती दीदी, सनद वाटप, प्रॉपर्टी कार्ड वाटप यांचे वाटप केले.

या वेळी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रमसिंह राजपूत, गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील, महसूल नायब तहसीलदार सोनाली वाघ, नायब तहसीलदार जाधव साहेब, निवडणूक नायब तहसीलदार गोंजारी, मंडलाधिकारी सुहास कांबळे, ग्राम महसूल अधिकारी रोहन यादव, गणेश सुतार, हरिश्‍चंद्र फरांदे, कल्पेश कठारे, बाबा भागवत, दत्तात्रेय जगदाळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अमित झेंडे, योगेश काळे, सरपंच रूपेश राऊत, शब्बीर सय्यद आदी उपस्थित होते.
शिवव्याख्याते प्रा. सतीश कुमदाळे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India responds strongly to Trump: ट्रम्प यांचे आरोप अन् टॅरिफ वाढवण्याच्या धमकीला आता भारताचंही सडेतोड प्रत्युत्तर, म्हटले...

Video Viral : गुजरातमध्ये हत्तीवर अन्याय! व्हिडीओ व्हायरल; 'महादेवी'प्रमाणे पेटा लक्ष घालणार का?

Local Block: मोठी बातमी! ५ ते ८ ऑगस्टपर्यंत लोकलचा विशेष ब्लॉक, सेवा पूर्णपणे बंद राहणार, जाणून घ्या वेळापत्रक

Truck Accident : गोंडपिपरीत विचित्र अपघात! ट्रॅकने एक किलोमीटर नेले फरफटत; एकाचा मृत्यू, तीन गंभीर

Trump accuses India :''रशियाकडून तेल खरेदी करून भारत कमावतोय नफा'' ट्रम्प यांचा आरोप; अन् टॅरिफ वाढवण्याचीही धमकी!

SCROLL FOR NEXT