सासवड शहर, ता. २१ : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सासवड (ता. पुरंदर) येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न पार पडला.
वर्षभरातील वक्तृत्व स्पर्धा, निबंध, चित्रकला, प्रश्नमंजूषा, क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, स्कॉलरशिप परीक्षा, एस.एस.सी, एच. एस. सी परीक्षेमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना कवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. समारंभाच्या प्रास्ताविकात विद्यालयाचे प्राचार्य इस्माईल सय्यद यांनी शाळेतील उपक्रम व गुणवत्तेविषयी माहिती देऊन पाहुण्यांचा परिचय करून दिला. वार्षिक अहवाल वाचन विजय खोमणे यांनी केले. डॉ. बर्वे यांनी स्वरचित कविता व गीतांचे सादरीकरण केले. यावेळी शास्त्रीय संगीत गायक राजीव बर्वे व गायिका आणि संगीतकार प्रांजली बर्वे यांनी सुद्धा शास्त्रीय गीताचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सासवड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप या होत्या. यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अरुण जगताप, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, नगरसेवक बाळासाहेब भिंताडे, संतोष जगताप, सुनील जगताप, प्राध्यापक केशव काकडे, पांडुरंग शिवरकर, नगरसेवक ज्ञानेश्वर गिरमे उपस्थित होते. सूत्रसंचालन नंदादीप कदम यांनी, तर प्राध्यापक राजेश राणे यांनी आभार मानले.
12467
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.