पुणे

कुंभारवळण येथे रंगली बालगीतांची मैफील

CD

सासवड शहर, ता. २२ : ‘कावळेदादा काव काव, कुकुच कू कोंबडा, टम्मू टमाटा’, या आणि इतर गीतांच्या ठेक्यावर नृत्य करत लहान मुलींनी बालगीतांच्या मैफलीला भरभरून प्रतिसाद दिला. कुंभारवळण (ता. पुरंदर) येथील ममता बाल सदनाच्या सभागृहात रविवारी (ता. २१) या मैफलीचे आयोजन केले होते.
बालगीतांसाठी समर्पित ‘छोटू मराठी’ या यूट्यूब चॅनलची प्रस्तुती असलेल्या या मैफलीत भारती न्यायाधीश यांनी प्रारंभी श्री गणेशस्तवन सादर केले. त्यानंतर लहान मुलांच्या अनुभव विश्वातील स्वरचित एकापेक्षा एक सुमधुर गाणी सादर करून ममता बाल सदनातील मुलींना एका आगळ्यावेगळ्या स्वरानुभूतीची प्रचिती दिली. युवा कलावंत पिनाक न्यायाधीश याने संगीतबद्ध केलेल्या आणि भारती न्यायाधीश यांनी गायलेल्या गाण्यांवर ताल धरत उपस्थित मुलींनी नृत्याच्या माध्यमातून मनमुराद आनंद लुटला. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सादर झालेल्या या कार्यक्रमात भारती न्यायाधीश यांच्यासोबत देवश्री कुलकर्णी यांनी निवेदनात सहभाग नोंदवत रंगत आणली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार विजय न्यायाधीश यांनी केले.
गोपालकृष्ण बहुउद्देशीय मंडळ संचलित ममता बाल सदनचे अध्यक्ष आणि पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे मानसपुत्र दीपक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभारवळणच्या सरपंच मंजुषा गोपाल गायकवाड यांनी या मैफिलीसाठी विशेष पुढाकार घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छोटू मराठी चॅनेलवरील बालगीतांची व्हिडिओ निर्मिती करणारे अक्षय कुलकर्णी, तसेच रोहीत शर्मा भारद्वाज, मधुश्री शर्मा भारद्वाज आणि विनोद शिराळकर यांनी परिश्रम घेतले.

12616

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT