पुणे

बोपगावच्या विजयची रिजनल रूरल बॅंकेत निवड

CD

गराडे, ता. २४ : बोपगाव (ता. पुरंदर) येथील विजय संजय फडतरे यांनी जिद्द, चिकाटी आणि कुटुंबाच्या पाठबळाच्या जोरावर मोठे यश संपादन केले आहे. गुजरातमधील रिजनल रूरल बॅंकेत प्रोबेशनरी ऑफिसर (स्केल- १) या पदासाठी त्यांची निवड झाली आहे. त्यामुळे बोपगाव पंचक्रोशीच्या वतीने त्यांच्या या यशाबद्दल त्यांचा सत्कार घेण्यात आला.
कै. जगन्नाथ शंकर फडतरे यांचे नातू व संजय जगन्नाथ फडतरे यांचे सुपुत्र असलेले विजय फडतरे हे शेतकरी कुटुंबातून आले आहेत. त्यांचे चुलते तुकाराम जगन्नाथ फडतरे यांनी लहानपणा पासूनच मोठं व्हा, अभ्यास करा आणि कुटुंबाचं नाव उज्ज्वल करा, हा मंत्र दिला. कुटुंबाकडे १३ एकर बागायती जमीन असूनही चुलत्यांनी विजय यांना कधीच शेतात कामाला लावले नाही, तर पूर्णवेळ अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले.
विजय फडतरे यांनी स्पर्धा परीक्षेच्या वाटचालीत दोन वेळा अपयश स्वीकारले. मात्र, खचून न जाता अधिक मेहनत घेत आरआरबी प्रोबेशनरी ऑफिसर (स्केल- १) पद मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली.
सत्कारावेळी वडील संजय जगन्नाथ फडतरे, आई छाया संजय फडतरे, चुलते तुकाराम जगन्नाथ फडतरे, चुलती, चुलत बंधू तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी योगेश फडतरे व इतर कुटुंबीय उपस्थित होते. तालुक्यातील अनेक मान्यवरांनी विजय फडतरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

माझ्या चुलत्यांची माझ्याकडून मोठ्या पदावर जाण्याची अपेक्षा होती. त्यांच्या विश्वासामुळे आणि कुटुंबाच्या पाठबळामुळेच मला या यशापर्यंत पोहोचता आले.
- विजय फडतरे

12622

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT