पुणे

पासलकर विद्यालयात शब्दांचा उत्सव

CD


​सासवड शहर, ता. २७ : अनेक विद्यार्थी मूळचे मराठी भाषिक नसतानाही त्यांनी अतिशय अस्सल मराठीत भाषणे केली. मराठी भाषेचा अभिजात दर्जा आणि कुसुमाग्रजांचे वाङ्मयीन योगदान हा केवळ साहित्याचा विषय नसून तो संस्कारांचा वारसा आहे, याचा प्रत्यय सासवड येथील वीर बाजी पासलकर विद्यालय शाळा क्र. १मध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आला.
महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा आणि सासवड नगरपालिका शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिन सोहळ्यात शब्दांचा उत्सव आणि संस्कारांची शिदोरी असा दुहेरी संगम पाहायला मिळाला.
​नटसम्राट आणि विशाखाची पुस्तके शाळेला भेट देण्यात आली. यावेळी मसाप सासवड शाखेचे कार्याध्यक्ष सतीश पाटील यांनी कुसुमाग्रजांची अजरामर पुस्तके नटसम्राट आणि विशाखा मुख्याध्यापिका माधुरी मुळीक यांच्याकडे सुपूर्द केली. कविवर्य अनिल कदम यांनी आपल्या ''समेवर येताना'' या संग्रहातील कविता सादर करून वातावरण काव्यमय केले.
​कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब मुळीक,ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कोडीतकर आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक तुकाराम मुळीक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सासवडच्या रस्त्यांवरून निघालेल्या ग्रंथदिंडीने आणि प्रभात फेरीने संपूर्ण परिसर मराठीमय झाला होता. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या चित्रांचे आणि स्वरचित कवितांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
प्रास्ताविक प्रा. केशव काकडे यांनी केले. यावेळी वर्षा खळदकर, वासंती बडदे, मीना कांबळे, संगीता हराळे, विजयश्री घोगरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजीव कांबळे यांनी केले, तर मुख्याध्यापिका माधुरी मुळीक यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Cancel : आखाताकडे जाणारी तीन विमाने पुण्यातून रद्द

Latest Marathi News Live Update : ४ कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिडकोने गृहनिर्माण योजनेची अंतिम मुदत; आता शेवटची तारीख काय?

Horoscope : नवा महिना, नवा राजयोग! उद्या 1 मार्चपासून पुढचे 4 दिवस 'या' 4 राशीच्या लोकांसाठी लकी, होणार धनलाभ

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

SCROLL FOR NEXT