पुणे

गुरुकुल ॲकॅडमीत ग्रंथ प्रदर्शन

CD

सासवड शहर, ता. २८ : महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा सासवड व गुरुकुल ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारीला ग्रंथ प्रदर्शन व २८ फेब्रुवारीला रांगोळीतून विज्ञान प्रदर्शन सादर करून मराठी भाषा गौरव दिन व विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
कविवर्य वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‍घाटन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवडचे अध्यक्ष ॲड. दिलीप निरगुडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष सतीश पाटील, राष्ट्रपती पारितोषिक विजेते कुंडलिक मेमाणे, प्रा. डॉ. सुभाष तळेकर, आप्पासाहेब भांडवलकर, विजय गुरव, जगदीश शिंदे तसेच प्रा. डॉ. संदीप टिळेकर आदी उपस्थित होते. सुमारे १० ते ११ हजार विविध लेखकांची पुस्तके असलेले समृद्ध वाचनसंकुल विशेष आकर्षण ठरले.
कुसुमाग्रजांच्या स्मृतीला अभिवादन करत गौरव दिनाच्या ग्रंथ प्रदर्शन उपक्रमांमुळे सर्वांना ज्ञानाच्या शिदोरीचा खजिना मिळाला असल्याचे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवडचे अध्यक्ष ॲड. दिलीप निरगुडे यांनी सांगितले.
रांगोळीतून विज्ञानाचे महत्त्व सादर करत गुरुकुलच्या विद्यार्थिनींनी आपली कला या ठिकाणी दाखवून दिली असल्याचे सतीश पाटील व प्रा. डॉ. सुभाष तळेकर यांनी सांगितले. ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन व्यवस्थापक दिलीप पापळ, उषा टिळेकर, जयश्री शिंदे व विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी यांनी केले.

पुस्तकांची झाल भेट
लग्नात भांड्याची झाल न घेता पुस्तकांची झाल भेट देण्यात आली होती. ही भेट माझे वडील दिवंगत चंद्रकांत टिळेकर यांच्या संकल्पनेतून मिळाली होती. ती झाल आजही जपून ठेवली असून याच माध्यमातून गुरुकुल ॲकॅडमीत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला याचा लाभ कसा होईल. यासाठी माझा व माझी पत्नी उषा टिळेकर यांचा सातत्याने प्रयत्न असतो, असे गुरुकुल ॲकॅडमीचे प्राचार्य डॉक्टर संदीप टिळेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक पे 69000 रुपये, वार्षिक वाढ 6 टक्के; 51 पानांचं निवेदन

Radhanagari Bee Attack: रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणं पडलं महागात! कावळ्यासोबत मधमाशा आल्या अन्; १०० जखमी तर १२ गंभीर, लोकांना पळता भुई थोडी, व्हिडिओ व्हायरल

Ruturaj Gaikwad: 'काळजी नको, लवकरच मी...', ऋतुराज खराब फॉर्मवर स्पष्ट बोलला; CSK च्या खराब फिल्डिंगबद्दल काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update: नेस्को सेंटर मध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणात लायझनिंग करणारा इंद्रजीत सिंग याला तात्काळ अटक करा; मनसेची मागणी

चौधरी बिहारचे नवे 'सम्राट', मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी, नितीशकुमार उपस्थित

SCROLL FOR NEXT