पुणे

सासवड येथे ‘आधुनिक कहाण्यांच्या’ हस्तलिखिताचे प्रकाशन

CD

सासवड शहर, ता. ३ : सासवड येथील अनुसया चॅरिटेबल ट्रस्टच्या सभागृहात २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज दर्शन : एक आनंद यात्रा कार्यक्रमात ‘कहाण्या व कथा नवीन व्रतवैकल्यांच्या’ या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.
सासवडमधील काही महिला एकत्र येऊन त्यांनी वाचन कट्टा तयार केला. ५० महिला कट्ट्याच्या सदस्य झाल्या. दर बुधवारी नियमितपणे एकत्र जमू लागल्या. पुस्तकाचे वाचन करू लागल्या. त्यातून त्यांना कहाण्या लिहिण्याची कल्पना सुचली. मराठीतल्या पारंपारिक कहाण्याचा ढाचा तसाच ठेवून त्यांनी कहाण्या लिहिल्या. अशा तेवीस कहाण्यांचे ‘कहाण्या व कथा नवीन व्रतवैकल्यांच्या’ हे हस्तलिखित तयार करण्यात आले.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून या आधुनिक कहाण्यांच्या हस्तलिखिताचे प्रकाशन प्रा. डॉ. नारायण टाक यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविकात स्नेहल देशपांडे यांनी वाचन कट्ट्याच्या वाचू आनंद या उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. प्रतिदा माहूर यांनी सूत्रसंचालन केले. अलका कारंडे व सुनेत्रा काळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी पुरंदर तालुक्याचे माजी आमदार अशोक टेकवडे आणि कवी हनुमंत चांदगुडे. दिलीप गुरव, पुरंदर कलामंचचे कार्यकर्ते उपस्थित होते. शलाका गोळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT