पुणे

करडे सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध

CD

गुनाट, ता. १ : करडे (ता. शिरूर) येथील करडे विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रल्हाद वाळके तर उपाध्यक्षपदी तुषार रोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, बाजीराव गाडे व निखिल देशमुख यांनी अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षपदांच्या निवडीसाठी संचालकांची बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशांत पिसाळ यांनी काम पाहिले. यावेळी जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्य वृषाली वाळके, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, बबन वाळके, माजी उपसरपंच गणेश रोडे, सचिव शरद भोसले, राजेंद्र गायकवाड, कैलास वाळके, बाळासाहेब वाळके, लक्ष्मण वाळके, विशाल घायतडक यांसह गावातील विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. शेतकरी सभासदांच्या हिताचे निर्णय डोळ्यासमोर ठेवूनच आपण काम करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रल्हाद वाळके यांनी सांगितले.
0335, 0337

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: खामेनेई कुठे लपलेत हे कसं कळलं? अमेरिका आणि इस्रायलने नियोजित वेळेपूर्वी हल्ला का केला? आतली माहिती आली समोर!

IND vs WI: टर्निंग पॉईंट! द. आफ्रिकेला दुसऱ्या स्थानावर ढकलण्याची भारताला संधी; इंग्लंडला टाळायचे असेल तर समजून घ्या गणित

Crime: 'त्या' गोष्टीचा राग डोक्यात गेला; आधी वाद घातला, नंतर फावड्याने वार जीवानिशी संपवला, राजस्थानी तरुणासोबत सांगलीत काय घडलं?

Rangpanchami 2026: रंगपंचमीच्या दिवशी त्वचा खराब होण्याचं टेन्शन येतंय? मग आजच करा 'हे' स्किनकेअर रुटीन फॉलो

Shaktipith Highway: शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी सुरू; कलम १६३ लागू, गावांमध्ये तणाव, शेतकऱ्यांचा संवादाचा आग्रह!

SCROLL FOR NEXT