पुणे

मावळ तालुक्यात गव्हाचे पीक जोमात

CD

इंदोरी, ता. २१ : यंदा भरपूर पाऊस आणि समाधानकारक थंडी पडल्याने मावळ तालुक्यात गव्हाचे पीक जोमात आले असून, इतर रब्बी पिकांचीही स्थिती समाधानकारक आहे.
सुमारे तीन ते साडेतीन महिन्यांत येणारे गव्हाचे पीक सध्या ओंबी अवस्थेत आहे. मावळच्या पूर्व पट्ट्यातील इंदोरी, वराळे, नाणोली, सुदवडी, सुदुंबरे, जांबवडे, सांगुर्डी, कान्हेवाडी, कोटेश्वरवाडी आणि माळवाडी या गावांमध्ये गव्हाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. टोकण पद्धतीने पेरणी करताना एकरी साधारण २० किलो बियाणे लागते, तर साध्या पेरणीत २५ ते ३० किलो बियाण्याची गरज भासते. ‘मालविया एच.यू.डब्ल्यू.-५१० (नोव्हेल कंपनी)’ या वाणाला शेतकऱ्यांची विशेष पसंती आहे.
कोटेश्वरवाडीचे प्रयोगशील शेतकरी गजानन दाभाडे आणि इंदोरीचे शंकर उबाळे यांनी सांगितले की, ‘‘खत व औषधांचे योग्य नियोजन केल्यास एकरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन सहज मिळू शकते.’’ सध्या परिसरात बटाटा काढणी सुरू असून, उत्पादन समाधानकारक आहे. मात्र, दर क्विंटल केवळ ८०० ते १००० रुपये भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची खंत सांगुर्डी येथील सुदाम भसे व महेश भसे यांनी व्यक्त केली.
हिवाळी उशिराचा कांदा दोन ते अडीच महिन्यांचा झाला असून, सध्या खताचा तिसरा हप्ता देण्याचे काम सुरू आहे. ढगाळ वातावरणामुळे करपा व मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून, वेळेत दोन-तीन कीटकनाशक फवारण्या करणे आवश्यक असल्याचे आबासाहेब हिंगे व आबासाहेब काशीद यांनी सांगितले.
ऊस तोडणी हंगाम संपत आला असून, नव्या ऊस लागवडीला सुरुवात झाली आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी घेतल्या जाणाऱ्या मका पिकाचे क्षेत्र मावळच्या पूर्व भागांत लक्षणीय वाढत असल्याचे चित्र आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT