पुणे

इंदापूरकरांच्या पाहुणचाराने भारावले वैष्णवजन

CD

इंदापूर, ता. ३० : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा रविवारी (ता. २९) मुक्कामासाठी इंदापूर शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात विसावला. यावेळी इंदापूरकरांच्या पाहुणचाराने संपूर्ण वैष्णव जन भारावून गेले होते. दरम्यान पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करीत दर्शन रांग तब्बल तीन किलोमीटरपर्यंत गेल्याचे पाहायला मिळाले.
निमगाव केतकी येथील मुक्काम आटोपून पालखी सोहळा इंदापूर शहराच्या वेशीवर आल्यावर इंदापूरकरांच्यावतीने जोरदार स्वागत केले. त्यानंतर रिंगण सोहळा झाल्यानंतर आरती होऊन पालखी सोहळा नियोजित मुक्काम स्थळी विसावला. तेथे लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
दरम्यान वैष्णवांची सेवा घडावी, यासाठी अनेक इंदापूरकर वारकऱ्यांना आपल्या घरी स्नेहभोजन करण्यासाठी घेऊन जात होते. विविध संस्था, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, यांनी जागोजागी वारकऱ्यांसाठी चहा, पाणी, नाष्टा, जेवण,आरोग्य तपासणी आदींची सोय केली होती. पालखी सोहळा विसावल्यानंतर दुपारचे जेवण करून अनेक ठिकाणी कीर्तनामध्ये भक्तिमय वातावरणात इंदापूरकर रमल्याचे दिसून आले. टाळ, मृदंग, पखवाज यांचा आवाज शहरभर लयबद्ध पद्धतीने पसरल्याने एकच नाद सर्वांच्या कानी पडत होता. तर इंदापूर शहराच्या प्रशासकीय भवनाशेजारील मैदानात मनोरंजनासाठी मोठे पाळणे, घरगुती उपयोगासाठीच्या वस्तूंचे स्टॉल, महिला, लहान मुले यांच्यासाठीच्या वस्तूंचे वेगवेगळे स्टॉलवर इंदापूरकरांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.
शहरातील सेवाभावी संस्थानी वारकऱ्यांची मनोभाने सेवा केली. यामध्ये शहा ब्रदर्सचे नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्ट, प्रदीप गारटकर मित्रपरिवार, हर्षवर्धन पाटील मित्र परिवार, सोनाई परिवार, भगवानरान भरणे नागरी सहकारी पतसंस्था, कै. अजित ढवळे मित्र परिवार, इंदापूर अर्बन बँक, स्वर्गीय मंगेशबाबा पाटील प्रतिष्ठान, युवा क्रांती प्रतिष्ठान, अजिंक्य जावीर मित्रमंडळ, पतंजली योग समिती, वृक्ष संजीवनी परिवार, जय हिंद माजी सैनिक संघटना, जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, भारतीय जैन संघटना, इंदापूर सायकल क्लब, वॉलमॉंट कंपनी, पुणे सोलापूर एक्सप्रेस वे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, राधिका सेवा मंडळ, रचना फार्म, आईसाहेब रिक्षा स्टॉप, रोटरी क्लब ऑफ इंदापूर, शरद पवार गटाचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील मित्रपरिवार, सुनील आरगडे मित्र परिवार, इंदापूर तालुका डॉक्टर सेल, डॉक्टर कदम गुरुकुल, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल, गुरुकुल गोखळी, इंदापूर पोलिस स्टेशन, क्रीडा संकुल येथील गुड मॉर्निंग ग्रुप, समर्थ सोशल फाउंडेशन अभिनव ग्रुप, रेड स्वस्तिक सोसायटी, धर्मवीर मित्र मंडळ, यांच्यासह अनेक सेवाभावी संस्थानी वारकऱ्यांच्यासाठी भोजन, अल्पोपाहार, फराळ आरोग्य तपासणी चप्पल दुरुस्ती औषधे दूध चहा, बिस्कीट, चरण सेवा यासारखे सेवा दिल्या. यामुळे वैष्णवजन भारावून गेले. दरम्यान रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT