इंदापूर, ता. २१ : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त न्यायालयासमोरील त्यांच्या पुतळ्यासमोर जयंती उत्सव समितीच्या वतीने रविवारी (ता.२०) मिरवणूक काढण्यात आली. या वेळी व्याख्यान व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच, प्रसिद्ध व्याख्याते राहुल गिरी यांचे व्याख्यान झाले.
क्रीडामंत्री भरणे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने सुरू केलेल्या घरकुल योजनेच्या लाभापासून कोणताही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, विलास वाघमोडे, दीपक जाधव, माऊली चवरे, माऊली वाघमोडे, श्रीमंत ढोले, हनुमंत कोकाटे, सतीश पांढरे, सचिन सपकाळ, अनिता खरात, मयूरी पाटील, बांधकाम विभागाचे उपअभियंता शिवाजी राऊत आदी उपस्थित होते.
दरम्यान, जयंती उपक्रमानिमित्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण माने यांच्यासह इतर मान्यवर आणि समाजबांधव यांनी अभिवादन केले. कार्यक्रमाचे नियोजन अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक पोपट पवार, अध्यक्ष अप्पा माने, कार्याध्यक्ष लक्ष्मण देवकाते, तानाजी नरोटे, बाळासाहेब नरोटे, सचिन गोफणे यांनी केले.
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव
अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने विलास वाघमोडे, बापू रेडके, प्रकाश शिंदे, बाळासाहेब कोळेकर, बाळासाहेब हरणावळ, शकुंतला मखरे, नवनाथ रूपनवर, डॉ. निखिल धापटे, अभिमान शिंदे, बाबासाहेब चवरे, मारुती मारकड, बळिराम जानकर, अँड. लक्ष्मण शिंगाडे, बाळासाहेब डोंबाळे, बाबा महाराज खारतोडे, सविता साळुंखे, डॉ.सी.ए. पाटील यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.