पुणे

इंदापुरातील गुंतवणूकदारांना ४० लाखांचा गंडा

CD

इंदापूर, ता. २४ : सहा महिन्यांत रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ''द युनायटेड ग्रुप ऑफ कंपनी''ने इंदापूर परिसरातील आठ जणांची ३९ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सलील प्रकाश गौस आणि प्रतीक्षा दशरथ मोटे (दोघे रा. गोवा) यांच्यावर इंदापूर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १६)गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेब जालिंदर गलांडे (रा. गलांडवाडी क्र. २) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, संशयित आरोपींनी कंपनीचे सादरीकरण करून दररोज एक टक्का परतावा आणि सहा महिन्यांत मुद्दल दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. या आमिषाला बळी पडून फिर्यादींसह अन्य लोकांनी नोव्हेंबर २०२३ ते जून २०२४ दरम्यान सुमारे ४० लाख रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी १ ते ३ फेब्रुवारी २०२४ दरम्यान गोव्यात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करून भेटवस्तूंचे आश्वासनही देण्यात आले होते. त्यानंतर फिर्यादींसह इतरांनी टप्प्याटप्प्याने रोख, आरटीजीएस व फोन-पे द्वारे विविध खात्यांवर रक्कम जमा केली होती. मात्र, मुदत संपल्यानंतर परतावा देण्यास टाळाटाळ सुरू झाल्याने फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले.

यांनी दिलेली रक्कम (रुपयांत)
बाळासाहेब गलांडे : १२ लाख ९२ हजार, विकास कादबाने : २ लाख १० हजार, आशा कादबाने : ८५ हजार, हनुमंत ढेकळे : ४ लाख ९५ हजार, पोपट कांबळे : १ लाख, सोपान शेंडे : ७ लाख ९२ हजार, जनार्दन मिसाळ : १ लाख, विजय शिंदे : ४ लाख ३२ हजार, छाया गदादे : ४ लाख ६० हजार असे एकूण ३९ लाख ६६ हजार रुपये यासह अन्य काही जणांनीही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.

मध्यस्थांचाही उल्लेख
या प्रकरणामध्ये फिर्यादीचा चुलत भाऊ प्रकाश पांडुरंग गलांडे त्यांच्यासोबत त्याच्या ओळखीचे मित्र जितेंद्र परशुराम म्हेत्रे (रा.अकलूज,ता.माळशिरस), बापू बबन काटे (रा.काटेवाडी,ता.बारामती), बाळासाहेब किसन भोंग, राणी बाळासाहेब भोंग (दोघे रा.निमगाव केतकी) या सर्वांनी फिर्यादीच्या घरी येऊन फिर्यादीला या कंपनीबाबत माहिती देऊन गुंतवणूक करीत जादा फायद्याचे आमिष दाखवल्याचेही नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, तक्रार १६ फेब्रुवारी २०२६ला दाखल करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट! कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी समिती स्थापन

Latest Marathi News Live Update : सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठली

Pune News : आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रभाग स्तरावर नियोजन करा; महापौर मंजूषा नागपुरे यांचे आदेश

Pune Crime : खंडणीसाठी युवकाचा स्वतःच्या अपहरणाचा बनाव; घरातूनच मागितली दोन लाख रुपयांची खंडणी

PAK vs ENG, T20 WC: “बॉल कुठे, बॅट फिरवतोस कुठे?” बाबर आजमची विकेट चर्चेत; पाकिस्तानचा पायावर कुऱ्हाड मारणारा निर्णय अन् इंग्लंडची सरशी

SCROLL FOR NEXT