इंदापूर, ता. ११ ः ‘‘कठोर परिश्रम, जिद्द आणि सकारात्मक दृष्टीकोन यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते,’’ असे प्रतिपादन अत्यंत कठीण परिस्थितून यशस्वी हॉटेल उद्योजिका अनुसया शंकर सूर्यवंशी यांनी केले.
इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज येथे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरणावर विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून यशस्वी उद्योजिका अनुसया शंकर सूर्यवंशी उपस्थित होत्या. यावेळी विद्या प्रतिष्ठान, बारामती येथील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ. राजश्री पाटील यांनीही विशेष मार्गदर्शन केले. यावेळी सूर्यवंशी यांनी आपल्या उद्योजकीय प्रवासातील अनुभव विद्यार्थिनींसमोर मांडले.
यावेळी बोलताना डॉ. राजश्री पाटील म्हणाल्या, ‘‘केवळ नोकरीच्या संधींचा विचार न करता नवकल्पना, तंत्रज्ञान आणि कौशल्यांच्या आधारे स्वतःचा व्यवसाय उभारण्याची मानसिकता विकसित करणे आवश्यक आहे. शिक्षण घेत असतानाच विद्यार्थिनींनी विविध कौशल्ये आत्मसात करून आत्मनिर्भर बनावे.’’
या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी इतिहासातील महान स्त्री व्यक्तिमत्त्वांवर आधारित भूमिका सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. श्रद्धा गलांडे यांनी जिजाऊ, मनीषा ओव्हाळ यांनी सावित्रीबाई फुले, मानसी चौधरी यांनी महाराणी येसूबाई, सृष्टी जगताप यांनी महाराणी ताराबाई, तर अदिती शिंदे यांनी सरोजिनी नायडू यांची प्रभावी भूमिका सादर केली. तसेच अश्विनी बनसोडे व श्रावणी मखरे यांनी सामाजिक संदेश देणारे नाट्य सादरीकरण केले.
यावेळी महिला तक्रार व निवारण समितीच्या अध्यक्षा प्रा. विदुलता जाधव, प्रा. सचिन पवार व प्रा. संतोष देवकाते यांनी नियोजन केले. प्रा. प्रियांका सूर्यवंशी यांनी मनोगत, प्रा. सोनाली काळे यांनी सूत्रसंचालन, तर भारती नलवडे यांनी आभार मानले.
07225
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.