इंदापूर, ता. १२ ः ‘‘रमजान महिन्याच्या पवित्र वातावरणात हिंदू- मुस्लिम बांधवांमध्ये बंधुभाव आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत व्हावे, या उद्देशाने इंदापूर येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे समाजात सलोखा वाढतो आणि परस्परांमधील आपुलकी अधिक दृढ होते,’’ असे प्रतिपादन नगराध्यक्ष भरत शहा यांनी केले.
इंदापूर येथील दर्गा मस्जिद चौक येथे अर्शद सय्यद मित्र परिवाराच्या वतीने रमजान महिन्यानिमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी नगराध्यक्ष शहा बोलत होते.
या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, नगरपरिषदेचे गटनेते शकील सय्यद, नगरसेवक उमेश मखरे, अक्षय सूर्यवंशी, पोपट शिंदे, अब्दुल मुशाइदी, फिरोज पठाण, गफूर सय्यद, ॲड. आसिफ बागवान, रियाज बागवान आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भरत शहा म्हणाले की, ‘‘रमजान महिना मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात दिवसभर उपवास करून सायंकाळी एकत्र येत रोजा सोडण्याची परंपरा आहे. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून सर्व समाजघटक एकत्र येऊन बंधुभावाने संवाद साधतात. ही शहरातील जपली गेलेली परंपरा कौतुकास्पद आहे.’’ या कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आयोजक अर्शद सय्यद यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.