पुणे

पुणे-मिरज रेल्वेगाडीचे जेजुरीत भंडारा उधळून स्वागत

CD

जेजुरी, ता. ६ ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून पुणे-कोल्हापूर लोहमार्गावर पुणे-मिरज सुपरफास्ट पॅसेंजर गाडी ही साप्ताहिक रेल्वेगाडी रेल्वे प्रशासनाने सुरू केली. जेजुरीकरांनी भंडारा उधळून गाडीचे स्वागत केले.

ही गाडी येथील लोहमार्गावरून दर मंगळवारी धावणार आहे. पुणे येथून सकाळी ८ वाजता सुटणार असून जेजुरीत ८ वाजून ५५ मिनिटांनी पोहचेल. लोणंद, सातारा, कराड, सांगली येथे थांबा घेत ही गाडी मिरजला पोहचेल. दुपारी पावणेदोन वाजता पुन्हा परतीचा प्रवास करणार आहे. सायंकाळी ६. ०५वाजता जेजुरीत तर सायंकाळी ७ वाजता पुणे येथे पोहोचणार आहे.
रेल्वे गाडी सुरू व्हावी, लांब पल्ल्याच्या गाड्यांना जेजुरीत थांबा मिळावा, अशा मागण्यांचा सतत पाठपुरावा करणारे माजी नगरसेवक तथा उद्योजक मेहबूब पानसरे, प्रवासी वाहतूक संघाचे विजय खोमणे, संजय माने, गणेश आबनावे, देवसंस्थानचे माजी विश्वस्त शिवराज झगडे, तानाजी झगडे आदींनी केला.
यावेळी रेल्वेचालकाचा व स्टेशन मास्टर यांचा सन्मान करण्यात आला. ही गाडी दररोज धावावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तीन महिन्यांपूर्वी पुणे येथील रेल्वेच्या विभागीय कार्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी ही मागणी प्राधान्याने केली होती. नवीन गाडी सुरू झाल्याने जेजुरीत येणाऱ्या भाविकांना व कामगारांना फायदा होणार आहे. ही गाडी कोल्हापूर पर्यंत न्यावी, अशी मागणी केली. महालक्ष्मी अजमेर, हुबळी, गोवा आदी लांब पल्ल्यांच्या गाड्यांना जेजुरीत थांबा मिळावा, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून 3983 क्युसेक विसर्ग; कृष्णा नदीची पातळी वाढणार, आज सायंकाळपर्यंत पाणी पोहोचणार सांगलीत

Xiaomi 18 Pro Series होणार लाँच! 8500mAh बॅटरी, ड्युअल 200MP Leica कॅमेरा; पाहा नव्या फ्लॅगशिपचे भन्नाट फीचर्स!

Mumbai Water Metro: मुंबई वॉटर मेट्रोसाठी समुद्रतळाचा मोठा अडथळा; खडकाळ भागात ‘रॉक ड्रेजिंग’, २५० किमी जलमार्गांचा विकास

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT