जेजुरी, ता. १८ ः जेजुरी शहरासाठी दोन पाणीयोजना असताना चार ते पाच दिवसांनी पिण्याचे पाणी मिळत आहे. त्यामुळे जेजुरी शहरातील ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक झाली आहे.
पाणीप्रश्नासाठी ते मैदानात उतरले असून त्यांनी अधिकारी व पदाधिकऱ्यांना निवेदन देत पाणी प्रश्नावर लक्ष वेधले आहे. जेजुरी शहरासाठी नाझरे धरण व मांडकी डोहातून पिण्याच्या पाण्याची योजना आहे. मात्र, जेजुरीला गेली अनेक दिवसांपासून चार ते पाच दिवसांनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होता.
उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाणी टंचाईची समस्या आता वाढू लागली आहे. नाझरे धरणात पुरेसे पाणी असताना व पर्यायी म्हणून मांडकीची योजना असताना शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. चार ते पाच दिवसांनी पाणी येते, तेही पुरेसे नाही. येथे येणाऱ्या भाविकांनाही पाणी टंचाईचाच सामना करावा लागतो. शहराच्या काही भागात
विंधनविहिरी कोरड्या पडल्या आहेत. अनेकांना टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागते. पाणी वाटपाचे नियोजन नाही. कोणत्या दिवशी पाणी येणार याबाबत माहिती दिली जात नाही.
त्यामुळे दुपारच्यावेळी पाणी सोडल्यास कामगार नोकरदारांना पाणी भरता येत नाही. किमान दिवसाआड पिण्याचे पाणी मिळावे, अशी ज्येष्ठ नागरिक संघटनेची मागणी आहे.
संघटनेचे अध्यक्ष शामकाका पेशवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठराव घेऊन त्याचे निवेदन मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, तहसीलदार, आमदार विजय शिवतारे यांना
दिल्याचे सुहास बारभाई व सुरेश पवार यांनी सांगितले.
‘प्रश्न नाही सुटला तर आंदोलन करू’
पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचे ज्येष्ठ नागरिक संघटनेने ठरविले आहे. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष शामकाका पेशवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत
शहरातील नागरिकांना दिवसाआड पाणी मिळावे, असा ठराव केला आहे. याबाबत लवकरच पालकमंत्री अजित पवार यांना भेटून पाणी टंचाईबाबत माहिती देण्यात येणार असल्याचे
सांगण्यात आले. पाणी प्रश्न लवकर न सुटल्यास सर्व चारशे ज्येष्ठ नागरिक आंदोलन करणार असल्याचे सुरेश पवार व सुहास बारभाई यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.