पुणे

कोळविहिरे, नाझऱ्यात बिबट्याची दहशत

CD

जेजुरी, ता.३१ : कोळविहिरे, नाझरे व जवळार्जून (ता.पुरंदर) परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील शेतकरी व रात्रपाळी करणाऱ्या कामगारांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. यामुळे वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिक, शेतकऱ्यांकडून होत आहे.
कोळविहिरे परिसरातील किर्लोस्कर फेरस लिमिटेड कंपनीचे वनराईचे क्षेत्र आहे. कंपनीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडी आहे. या कंपनी भोवतालच्या झाडीमध्ये काही दिवस बिबट्या वास्तव्यास होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन बिबट्या असल्याची खात्री केली होती. त्यामुळे कंपनी कामगार व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण होते.
कोळविहिरे, नाझरे सुपे व नाझरे कडेपठार, जवळार्जून परिसरात उसाचे क्षेत्र होते. बिबट्याचे दर्शन झाल्याने अनेक जण सांगत आहेत. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून हा बिबट्या दिसत आहे. किर्लोस्कर फेरस कंपनीच्या झाडीमध्ये बिबट्याच्या वावर असल्याचे कामगार, सुरक्षा रक्षक यांनी पाहिले आहे. दरम्यान, वनविभागाने बिबट्याची माहिती संकलित केली आहे.

03199

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : महिला अत्याचारप्रकरणी माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी; आज सुनावली जाणार शिक्षा

Fake Shalarth ID Scam: न्यायालयाचे आदेश असूनही अटकेची कारवाई; शिक्षण सचिवांची पोलिस अधिकाऱ्यांना नाराजीची फोनवार्ता

Pune Municipal Corporation : प्रभागरचनेचे काम अंतिम टप्प्यात,आयुक्तांकडून आढावा; राज्य सरकारकडे सोमवारी होणार सादर

Monsoon Update: वरुणराजा मेहरबान, पाऊस सरासरीपार; विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये समाधानकारक वृष्टी

Manoj Jarange: आरोपींना तत्काळ अटक करा; जरांगे, महादेव मुंडे खून प्रकरण कारवाई न केल्यास बीड ‘बंद’चा इशारा

SCROLL FOR NEXT