पुणे

कुलधर्म कुलाचाराने षडरात्राची सांगता

CD

जेजुरी, ता. २६ : जेजुरीत चंपाषष्ठीनिमित्त खंडोबाच्या कुलधर्म कुलाचारासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दीड लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी गडावर आले होते.
खंडोबा दर्शन, देवभेट, तळी भरणे, अभिषेक पूजा आदी कार्यक्रम दिवसभर गडावर सुरू होते. वांग्याचे भरित, बाजरीची भाकरी या महाप्रसादाचा आस्वाद भाविकांनी घेतला. चंपाषष्ठीला कुलधर्म कुलाचाराचे विशेष महत्त्व आहे. सकाळी घट उठल्यानंतर उत्सवमूर्ती भांडारगृहात ठेवण्यात आल्या. खंडोबाची मानाची पूजा झाली. त्यानंतर घरोघरीचे घट उठले. गडावर दुपारी बारानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू झाला. चातुर्मासात वर्ज्य केलेले वांगे भाविक आणि जेजुरीकर या दिवसापासून खाण्यास सुरू करतात. त्यामुळे चंपाषष्ठीला बाजरीची भाकरी आणि वाग्यांचे भरीत असा महाप्रसाद केला जातो.
भाविकांना याच महाप्रसादाचे भोजन गडावर दिले जाते. दुपारी बारापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात आला.
जेजुरी गडासह, पायरी मार्गावर, पुजाऱ्यांच्या घरी, चिंचेच्या बागेत कुलधर्म कुलाचाराचे कार्यक्रम सुरू होते. अनेक भाविक दिवटी पेटवून खंडोबाला जात होते. विविध गावातील भाविक घरचे आणि गावचे देव भेटीसाठी आणत होते. तळी भरणे, भंडार उधळणे, टाक उजळणे असे कार्यक्रम दिवसभर सुरू होते.
खंडोबाचे मूळ ठिकाण असलेल्या कडेपठारावरही भाविक देवदर्शनासाठी जात होते. तेथेही पूजा, तळी भंडारा आणि भंडारा उधळणे आदी कार्यक्रम सुरू होते.
खंडोबाला पाने, फुले आणि भंडारा उधळून भाविक खंडोबाचा जयघोष करीत होते. देवसंस्थानच्या वतीने दर्शन रांग आणि इतर सुविधा भाविकांना पुरविण्यात आल्या. पुजारी सेवक वर्ग, देवसंस्थान आणि ग्रामस्थांनी उत्सवाचे आयोजन केले होते. सहा दिवस सुरू असलेल्या या उत्सवाची आज सांगता झाली. चंपाषष्ठीनिमित्त गडाभोवती विद्युत रोषणाई केली होती. गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT