पुणे

नाचताना धक्का लागल्याने तरुणास मारहाण

CD

जुन्नर, ता.२८ :आमलेवाडी (ता.जुन्नर) येथे ढाकोबाच्या यात्रा उत्सवात मिरवणुकीत नाचताना धक्का लागला. या कारणावरून तरुणास मारहाण करणाऱ्या दहा जणांविरोधात जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत फिर्याद किशोर जालिंदर केदार याने दिली आहे.
फिर्यादीनुसार पोलिसांनी शुभम आमले, राहुल आमले, अजिंक्य आमले, भास्कर आमले, अनुरुद्र आमले, दिनकर आमले, साहिल आमले, प्रणव आमले, धीरज आमले, सुनील आमले (सर्व रा.आमलेवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.
सायंकाळी यात्रेत काठीची मिरवणूक सुरू असताना किशोर याच्या हातातील काठीस लाथ मारून शिवीगाळ करत सुनील तेथून निघून गेला. यानंतर मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याचे कारणावरून त्यास हातातील लोखंडी कडे व फायटरने किशोर यास जखमी केले. पुढील तपास सहायक फौजदारभोजने करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : अर्धशतक करणारा तिलक वर्मा रनआऊट, सामना रोमांचक वळणावर

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT