पुणे

पेसा क्षेत्रामध्ये अवैध माती उत्खनन

CD

जुन्नर,ता.१३ : जुन्नरच्या आदिवासी भागातील खडकुंबे, जळवंडी, चावंड खैरे, खटकाळे, राजूर गावांच्या परिसरातील अवैध माती उत्खनन व वाहतूक थांबविण्यात यावी,अशी मागणी बिरसा ब्रिगेडचे कार्याध्यक्ष शुभम गवारी यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे केली आहे.

तालुक्यातील अनुसूचित (पेसा) क्षेत्रात अवैध माती उत्खनन व वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याबाबत अनेक तक्रारी करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. खडकुंबे व जळवंडी गावाच्या ग्रामसभांनी माती उत्खनन करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, माती उत्खनन हे पारंपरिक पद्धतीने करणे अपेक्षित असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जेसीबीच्या साहाय्याने माती उत्खनन केले जात आहे. उत्खननासाठी परवानगी दिलेले गटनंबर ऐवजी दुसऱ्याच गटात उत्खनन केले जात आहे. महसूल विभागाने दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक उत्खनन याठिकाणी झाले आहे. याबरोबर काहीं परवाना कालावधी संपला असताना सुद्धा उत्खनन सुरू आहे. यामुळे दोन्हीही गावांमध्ये चौकशी करण्यात यावी व कारवाही करावी. तसेच चावंड (खडवाडी) येथे अवैध माती उत्खनन व वाहतूक विना परवानगी सुरू आहे. त्यावर देखील कोणत्याही प्रकारची कारवाही केली जात नाही. खैरे व खटकाळे परिसरात शेत जमिन सपाटीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अवैध माती उत्खनन व वाहतूक केली जात आहे.

माती उत्खनन व वाहतूक रात्रीच्या वेळी केले जाते. याबाबत प्रशासनाकडून मात्र कोणत्याही प्रकारे कारवाही केली जात नाही. एखादी दुसरी जुजबी कारवाई केली जाते.
जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका घोषित करण्यात आलेला आहे. अवैध माती उत्खननमुळे या पर्यटन क्षेत्राला धोका निर्माण झालेला आहे. माती उत्खनन करताना मोठ्या प्रमाणात झाडे जेसीबीच्या साहाय्याने फेकून दिली जात आहे. अश्याच प्रकारे आदिवासी भागात माती उत्खनन व वाहतूक करत राहिले तर माळीण सारखी दुर्घटना घडण्यास वेळ लागणार नाही.
दरम्यन, याबाबत महसूल विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
05149

चावंड (ता.जुन्नर) : मातीचे उत्खनन केलेली जमीन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT