पुणे

शेतकऱ्यांना दिलासा, ‘विघ्नहर’ला फटका

CD

जुन्नर, ता. २७ : येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिलांची देयके ऊस बिलाच्या रक्कमेतून वसूल न केल्याने वीज वितरण कंपनीने दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे कारखान्यास मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याची माहिती विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.
याबाबत अध्यक्ष शेरकर म्हणाले, ‘‘विघ्नहर कारखान्याच्या सहा मेगा वॅट क्षमता असलेल्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या करारानुसार ऊस पुरवठा करणाऱ्या‍ शेतकऱ्यांच्या ऊस बिलांमधून संबंधित शेतकरी वर्गाच्या थकीत वीज देयकांची रक्कम वसुल करून द्यावी, असे नमूद होते. तथापि विघ्नहर कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस बिलातून थकीत वीज देयके कपात करण्यास प्रखर विरोध दर्शविला. त्यामुळे कारखान्याने संबंधितांची थकीत वीज देयके ऊस बिलांमधून वसूल केली नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी वर्गास दिलासा मिळाला. परंतु, त्यामुळे वीज वितरण कंपनीने कारखान्यास आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी २६ लाख २१ हजार ६० व सन २०२१-२२ साठी ३० लाख ५१ हजार ९२ रुपये, असा सुमारे ५६ लाख ७२ हजार १५२ रुपये दंड आकारणी केली. ऊस उत्पादकांची थकीत वीज देयके वसुल न केल्याने मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT