पुणे

घाटघर परिसरातील दारूधंद्यांवर महिला, ग्रामस्थांकडून कारवाई

CD

जुन्नर, ता. ९ : घाटघर (ता. जुन्नर) येथील ग्रामस्थ व महिलांनी बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांना मुद्देमालासह पकडून जुन्नर पोलिसांच्या स्वाधीन केले.
सरपंच मनोहर नांगरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष राघू रावते, पेसा उपाध्यक्ष भीमाबाई वालकोळी, ग्रामपंचायत सदस्य सुनीता लांडे, वंदना रावते, गंगूबाई रावते, हिराबाई कोकणे, लीला लोखंडे, मंदाबाई वालकोळी आदी महिलांनी दारू विक्रेते अजिंक्य बापू खरात, तसेच तुळसाबाई पांडुरंग कोकणे, वैशाली दुंदा कोकणे व दूंदा पांडुरंग कोकणे (सर्व रा. घाटघर) यांच्याजवळील गावठी हातभट्टीच्या दारुसह चौघांना गुरुवारी (ता. ८) जुन्नर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून, त्यांच्याकडील २७ लिटर गावठी दारू हस्तगत केली.
गावचे सरपंच, सदस्य, तंटामुक्त व पेसा समिती सदस्य व महिला मंडळाने गावात दारूविक्री न करण्याबाबत त्यांना वारंवार सूचना दिली, मात्र सदर व्यवसाय पोलिसांच्या आश्रयाखाली सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. त्यामुळे ग्रामस्थांनी हे व्यवसाय बंद पाडले असून, गावात पुन्हा दारू विक्री होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे माजी सरपंच पोपट रावते यांनी सांगितले. घाटघर-नाणेघाट परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून देखील मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची विक्री होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर येथे होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता दारू विक्रीबाबत कडक कारवाईची मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : रसिखच्या एकाच षटकात दोन विकेट्स; हार्दिकचं अर्धशतकही हुकलं, मुंबईचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT