पुणे

जुन्नरच्या पश्चिमेकडेही बिबट्यांचा मुक्त संचार

CD

जुन्नर, ता. ३० : तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातदेखील बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांची चिंता वाढू लागली आहे. घोगरेवाडी- आपटाळे (ता. जुन्नर) परिसरात गेल्या काही दिवसांपासून तीन बिबटे सायंकाळनंतर मुक्तपणे फिरताना दिसून आल्याने त्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.
घोगरेवाडी- आपटाळे येथील ग्रामस्थ विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष महेंद्र पवार, जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब देवाडे, राजेश घोगरे, रोहिदास उत्तर्डे, बाळासाहेब उत्तर्डे यांनी या भागातील बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वनविभागाकडे केली. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात तीन बिबटे रात्रीच्या वेळी फिरताना अनेकांनी पाहिले आहे. त्यांचे व्हिडिओ देखील काढून समाज माध्यमात व्हायरल केले आहेत. या भागातील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी बाहेर पडणे भीतीचे झाले आहे. वीज मंडळाने पथदिवे सुरू करावेत, अशीही नागरिकांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘1 किलो सोयाबीन काढून दाखवा, क्विंटलभर काजू-बदाम घेऊन जा’; सोयाबीनच्या नुकसानीवर शेतकऱ्याचा संताप |

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Mangalwedha Drought: मंगळवेढ्यात पाणी-चाऱ्यासाठी काँग्रेसचे बेमुदत धरणे; काजू-बदामाच्या बैठकीवर चिरमुरे खाऊन आंदोलनाचा टोला

SCROLL FOR NEXT