पुणे

शरद सोनवणे यांच्या बदनामीकारक व्हिडिओप्रकरणी गुन्हा दाखल

CD

पुणे, ता. १९ : जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांची विधानसभा निवडणुकीत बदनामी करण्याच्या हेतूने माध्यमात व्हिडिओ प्रसारित केल्याच्या कारणावरून आपटाळे (ता. जुन्नर) येथील भाऊ देवाडे यांच्याविरुद्ध जुन्नर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच आयटी कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर विधानसभा निवडणुकीत माजी आमदार सोनवणे अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत. शनिवारी (ता. १६) देवाडे यांनी राजकीय द्वेषापोटी सोनवणे यांनी प्रतिमा मलिन करण्यासाठी बदनामीकारक मजकूर करून तयार केलेला बनावट अश्‍लील व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये बाळगला व सोशल मीडियावर प्रसारित केला. तसेच तुकाराम भालचिम याला पाठविला. माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणात व्हिडिओ प्रसारित करण्याच्या तसेच निवडणुकीत सोनवणे यांची मतदारांमध्ये बदनामी करण्यासाठी व्हिडिओ प्रसारित केल्याचे दर्शन फुलपगार यांनी सोमवारी (ता. १८) दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक किरण अवचर तपास करत आहेत. दरम्यान, याबाबत देवाडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
टीप : कृपया बातमी पुणे date line ने वापरावी ही विनंती
-----------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT