जुन्नर, ता. ४ : संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्ती योजनेच्या लाभार्थ्यांनी थेट बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होण्यासाठी मोबाईल क्रमांक आधारकार्डला जोडून ते बँक खात्याला लिंक करावे, याबाबतची कागदपत्रे संजय गांधी योजना कार्यालयात अथवा स्थानिक तलाठ्याकडे जमा करावीत, असे आवाहन नायब तहसीलदार सुरेश तिटकारे यांनी केले.
जुन्नर तालुक्यातील दिव्यांग विधवा, निराधार, अनाथ आदींना संजय गांधी व श्रावण बाळ, इंदिरा गांधी आदी योजनांचा लाभ दर महिन्याला नियमित मिळावा, यासाठी श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्राच्या वतीने नायब तहसीलदार सुरेश तिटकारे व अव्वल कारकून रोहिदास सुपे यांना निवेदन देण्यात आले. गेल्या तीन-चार महिन्यांपासून लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळत नसल्याचे अध्यक्ष अरुण शेरकर यांनी निर्दशनास आणून दिले. यावेळी संघटनेचे तालुक्यातील पदाधिकारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते.
नायब तहसीलदार तिटकारे म्हणाले, यापुढे लाभार्थीच्या बँक खात्यावर थेट अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना लाभार्थ्यांना दिल्या आहेत. लाभार्थ्यांनी आधारकार्ड व बॅंक खात्याला मोबाईल क्रमांक लिंक केले आहेत, त्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा होत आहे. ज्यांनी ही पूर्तता केली नाही त्यांचे अनुदान जमा नाही. अद्यापि विविध योजनांच्या सुमारे अडीच हजार लाभार्थ्यांनी त्यांच्या बॅंक खात्याला आधार लिंक केले नाही. त्यामुळे त्यांना अनुदान मिळत नाही. सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आधार लिंक करून घ्यावे.
यावेळी श्री राधेश्याम संस्थेचे उपाध्यक्ष राहुल मुसळे, सुनील जंगम, प्रताप मालेगावकर, सौरभ मातेले, श्रीहरी नायकोडी, केरभाऊ नायकोडी, मुस्तकिम पीरजादे, ताहोर आत्तार, गोरक्ष नरवीर व दिव्यांग बांधव उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.