पुणे

जुन्नरला हवाय पूर्ण वेळ गटशिक्षणाधिकारी

CD

जुन्नर, ता. ४ : जुन्नर तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी अनिता शिंदे यांची खेड पंचायत समितीत बदली झाली आहे. शिंदे यांच्याकडे जुन्नरचा प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून पदभार होता. खेडचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांच्याकडे जुन्नरचे गटशिक्षणाधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी काढले आहेत.

जुन्नर तालुक्यात २०१६ पासून पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी नियुक्ती केली नाही. गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांच्यानंतर गेल्या आठ वर्षांत पी. एस. मेमाणे, के. डी. भुजबळ, के. बी. खोडदे, अनिता शिंदे या विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला होता. शिक्षण विस्तार अधिकारी संचिता अभंग यांचीदेखील बदली झाली आहे. शिंदे यांच्या बदलीनंतर पूर्णवेळ  गटशिक्षणाधिकारी  मिळेल अशी अपेक्षा शिक्षक व्यक्त करत होते, मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.
जुन्नर तालुक्याचा शैक्षणिक व्याप मोठा असल्याने येथे पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी असणे गरजेचे आहे. अतिरिक्त प्रभारी अधिकारी तालुक्यातील शैक्षणिक बाबींना कितपत न्याय देऊ शकतील याबाबत शंका व्यक्त होत आहे. पूर्ण वेळ गटशिक्षणाधिकारी मागणीकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
गेल्या वर्षी शिक्षकांच्या आयकर भरण्याच्या विषयाबाबत शिक्षक वर्गात नाराजीची भावना आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सुमारे ३५० शाळा असून ९०० हून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. तालुक्याची भौगोलिक रचना पाहता शैक्षणिक गुणवत्तेबरोबर भौतिक सुविधा तसेच शिक्षकांचे विविध प्रश्‍न अडचणी सोडवण्यासाठी येथे पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी असणे गरजेचे असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT