पुणे

घंगाळदरे खून प्रकरणातील आरोपी पती अजूनही फरारी

CD

जुन्नर, ता. २५ : घंगाळदरे-दरावस्ती (ता. जुन्नर) येथे शुक्रवारी (ता. २१) पत्नीचा कोयत्याने वार करून निर्घृण खून करणारा आरोपी शंकर बारकू बांबळे अजूनही फरारी असून, तो कोणास मिळून आल्यास किंवा दिसल्यास जुन्नर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
अलका शंकर बांबळे (वय ३३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी शंकर हा चारित्र्याविषयी संशय घेत असल्याने अलका पतीसोबत राहत नव्हती. घंगाळदरे येथे मोबाईल व कागदपत्रे नेण्यासाठी आली असता अलका व शंकर यांच्यात बाचाबाची व भांडणे झाली. सासू लीलाबाई हिने अलकाचे केस पकडून खाली पाडले व हाताने मारहाण केली, तर पती शंकर याने कोयत्याने अलका हिच्या पाठीवर व कपाळावर वार केले. यात तिचा जागीच मृत्यू झाला होता.
आरोपी शंकर व त्याची आई लीलाबाई बारकू बांबळे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा घडल्यानंतर दोघेही आरोपी घराला कुलूप लावून जवळच्या दाट जंगलात पळून गेले होते. पोलिसांच्या पथकांनी, तसेच ड्रोनच्या साहाय्याने आरोपीचा शोध घेण्यात आला. लीलाबाई हिस ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले, मात्र शंकर अद्यापही मिळून आला नाही. त्याचा शोध घेण्यात येत आहे.
आरोपीविषयी माहिती मिळाल्यास भाग्यश्री धिरबस्सी, उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी जुन्नर (७०३८२५४८०६), पोलिस निरीक्षक किरण अवचर (७५८८९४२०६२), सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मोरे (८४८२८६६०५२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : युद्धाच्या पडछायेत...

मोठी बातमी! ‘या’ लाडक्या बहिणींना यंदा ३०० कोटींचे कर्ज; एक लाखापर्यंत कर्ज बिनव्याजी, तीन लाखांपर्यंत ७ टक्के व्याजदर, वाचा...

CA Exam Result : अबोलीच्या स्वप्नांना यशाची झालर; तरडोली येथील शेतकऱ्याच्या कन्येचे ‘सीए’ परीक्षेत घवघवीत यश

Grapes Loss : द्राक्ष उत्पादकांना १०० कोटींचा फटका; अतिवृष्टी, प्रतिकूल हवामानामुळे नुकसान

Mohol Politics : कोण होणार मोहोळचा सभापती? राजकीय हालचालीना आला वेग

SCROLL FOR NEXT