पुणे

जुन्नर तालुक्यात ६२ हजार मुलामुलींना जेई लसीकरण

CD

जुन्नर, ता. ३ : जुन्नर तालुक्यात आतापर्यंत ६२ हजार ९२८ (७० टक्के) मुला-मुलींना जॅपनीज एन्सेफलायटीस (जेई) लसीकरण केले आहे. वार्षिक परीक्षेपूर्वी लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. अश्‍विनी कुळमेथे यांनी दिली.
सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला बालकल्याण विभाग आणि शालेय शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक) यांच्यावतीने हे लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मावळ तालुक्यात १ ते १५ वर्षे वयोगटातील ८९ हजार ८९४ मुले असून आत्तापर्यंत ३२ हजार ३२० मुले व ३० हजार ६०८ मुली अशा एकूण ६२ हजार ९२८ जणांना लसीकरण केले आहे. यात १ ते ५ वर्षे वयोगटाची १७ हजार ८२८, ५ ते १० वर्षे वयोगटाची २१ हजार ४१३ व १० ते १५ वर्षे वयोगटाची २३ हजार ६८७ मुलांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई, गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्र, सर्व शासकीय व खासगी शाळा अंतर्गत एक वर्ष ते १५ वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येत आहे.
‘‘जपानी एन्सेफलायटीस (जेई) हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे. जो मेंदूवर परिणाम करतो. या आजारावर दीर्घकाळ नियंत्रण घालण्यासाठी जेई लसीकरण हा एकमेव पर्याय असल्यामुळे पालकांनी न घाबरता आपल्या मुलांना हे लसीकरण करून घ्यावे, असे जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्‍विनी कुळमेथे म्हणाल्या.

तालुक्यातील लसीकरण संख्या व कंसात टक्केवारी :
आळे - ६०१३, (६७.४५).
आपटाळे -५२४२, (७९.५७)
बेल्हे -४६१९, (६०.८३).
इंगळूण - १६२०, (६२.१९).
मढ- ३८०४, (६६.१९).
निमगावसावा- ३९१९, (७८.१९).
ओतूर-९७२४, (७५.२३).
पिंपळवंडी-३७५७, (७३.२२).
राजुरी-२४३१, (६४.०४).
सावरगाव-३६१४, (७०.९०).
शिरोलीबुद्रुक-४३.६४, (९६.५५).
वारूळवाडी- ११०१९, (५८.०१).
येणेरे-२७२२, (९०.१३).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानखुर्दमध्ये अपघातग्रस्त यंत्र हटवण्यासाठी रस्ता अडवला, १५ मिनिटांच्या अंतरासाठी ६ तास; दिवसभर वाहतूक कोंडी

Shiroli Assault Case Update : शिरोली अत्याचारप्रकरणाला नवं वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यास रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिल्याचा प्रकार; हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक

'लग्नाआधी गर्भवती राहिले ते बरं झालं' अभिनेत्री नेहा धुपिया खुलासा करत म्हणाली...'मी देवाचे आभार मानते की...'

Virar Crime: आई नाही म्हणतेय! प्रेयसीचा लग्नाला नकार; प्रियकराने प्रेयसीसह आईची हत्या केली, स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न

IPL 2026, GT vs RCB: बंगळूर-गुजरात आज लढणार; अहमदाबादमध्ये 'काँटे की टक्कर'; कशी असेल प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT