पुणे

आदिवासी भागातील शेतकरी हवालदिल

CD

जुन्नर,ता.२५ : सलग पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. बदलत्या हवामानामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेले पंधरा दिवस पडणाऱ्या पावसाने भात शेतीची कामे व अगोटाची कोणतीही तयारी करता आली नसल्याचे आदिवासी समाज प्रबोधिनीचे विश्वस्त तानाजी तळपे यांनी सांगितले.
यंदा आदिवासी भागात शेतकरी धूळ वाफेवरची पेरणी साधारणतः: रोहिणी ते मृग नक्षत्र निघण्याच्या अगोदर करतात. उद्यापासून सोमवारपासून (ता.२६) रोहिणी तर ८ जूनपासून मृग नक्षत्र सुरू होत आहे. जुन्नर तालुक्यात सुमारे ४० टक्के उन्हाळी बाजरी काढणे बाकी आहे. तसेच काढलेली बाजरीची कणसे पंधरा दिवसांपासूनझाकून ठेवली आहेत. त्यांना आवश्यक ऊन मिळत नसल्याने मोड यायला सुरुवात झाली आहे. याचबरोबर उन्हाळी भुईमूग देखील काढणे बाकी आहे. पावसामुळे शेंगाना जमिनीतच मोड यायला सुरुवात झाली आहे असल्याचे शिवेचेवाडी येथील आदिवासी शेतकरी बाळू मोधे यांनी सांगितले.

यापूर्वी गेल्या अनेक वर्षात अशी स्थिती पहावयास मिळाली नाही. ना मृग किडे, ना काजव्यांचे चांदणे नजरेस पडले. पहिल्या पावसाच्या मातीचा सुगंध देखील अनुभवता आला नाही.हा उन्हाळा आहे की पावसाळा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
- धोंडू लांडे, आदिवासी शेतकरी, केवडी


08559

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मान्सूनपूर्व पावसानं रत्नागिरी, सिंधूदुर्गला झोडपलं; येत्या ३ दिवसात वादळी वाऱ्यासह हजेरी लावणार, हवामान विभागाचा इशारा

Numerology : 'या' 4 मुलांकाच्या लोकांकडे असतो ज्ञानाचा खजिना; पण दुसऱ्यांना देतात चुकीची माहिती, यांच्यापासून रहा सावध

Kolhapur Gokul Dudh Sangh Election 2026 : आदेश आला रे..! कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू; ठराव दाखल तारीख जाहीर

नितीन देसाई नैराश्यात होते हे माहीत असूनही इंडस्ट्रीने त्यांना मदत का केली नाही? संजय जाधव यांनी सांगितलं कारण

Ganga Dussehra: भागीरथ प्रयत्नांची ती अमर गाथा! गंगा दशहऱ्याला काशीत भाविकांचा महापूर; जाणून घ्या आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT