पुणे

जुन्नरमधील रस्त्यांना नदीचे स्वरूप

CD

जुन्नर, ता.२७ : पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या नियोजना अभावी जुन्नर शहरातील बहुतेक रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त होत आहे. रस्त्यावरील लहान मोठया खड्ड्यामुळे पाण्याची तळी निर्माण होत आहेत. यातून वाट काढताना वाहन चालकांना तसेच नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने रस्त्याची विकासकामे नागरिकांच्या सोयीसाठी केली आहेत का? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. शहराच्या अनेक भागात पावसाचे पाणी वाहून जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.काही भागात पावसाचे पाणी घरात शिरत आहे. जुन्नर शहरात भुयारी गटार करताना फक्त सांडपाणी वाहून जाण्याचे नियोजन करून कामे उरकण्यात आली. पावसाचे पाणी गटरामध्ये जाण्यासाठी चेंबरवर जाळीची झाकणे नाहीत. यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी मात्र रस्त्यावरून वाहते तसेच रस्त्यावर साठून डबकी तयार होतात. नगरपालिका प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही. यामुळे विकासकामे निकृष्ट दर्जाची होत आहेत.

कामांची गुणवत्ता तपासली पाहिजे
नगर पालिकेची ९ जानेवारी २२ रोजी मुदत संपली.त्यांनतर तब्बल तीन वर्षे निवडणूक न झाल्याने प्रशासक राज आहे. सद्या तर पूर्णवेळ मुख्याधिकारी देखील नाही.प्रशासकीय काळात अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने झालेली सर्व कामे व त्यांची गुणवत्ता तपासली पाहिजे, अशी मागणी माजी नगरसेवक मधुकर काजळे यांनी केली आहे.

08571

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 5th Test: भारताविरुद्ध शतक केल्यानंतर जो रुटने डोक्याला बँड बांधून का केला आकाशाकडे इशारा? पाहा Video

दिल्लीत मोठ्या घडामोडी, PM मोदींनंतर गृहमंत्री शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट; एकाच दिवशी भेटीचं कारण काय?

Shambhuraj Desai: गृहप्रवेशावेळी शंभुराज देसाईंना अश्रू अनावर; ‘मेघदूत’ बंगल्यावर बालपणीच्या आठवणींना उजाळा

Raigad Fort Conservation: 'रायगड संवर्धनाला येणार वेग'; संभाजीराजे यांची केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांशी चर्चा

Meghna Bordikar: 'महायुतीच्या नेत्यांचा वाचाळपणा सुरूच'; कोकाटे यांच्यानंतर मेघना बोर्डीकर यांचे वादग्रस्त वक्तव्य

SCROLL FOR NEXT