खळद, ता. ३० : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळांची तपासणी सुरू झाली आहे. यामध्ये प्रत्येक शाळेची १५० गुणांमध्ये तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये पायाभूत सुविधांसाठी ३३ गुण, शासन ध्येयधोरणे अंमलबजावणीसाठी ७४ गुण तर शैक्षणिक संपादनासाठी ४३ गुणांमध्ये तपासणी होणार आहे.
पायाभूत सुविधांसाठी ३३ गुण
पायाभूत सुविधांमध्ये वर्गखोल्या ग्रंथालय, प्रयोगशाळा इतर खोल्या, मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष, प्रशासकीय कार्यालय, आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन, शाळेची स्वच्छता विषयक स्थिती, शालेय फर्निचर, शालेय सुरक्षा तरतुदी, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण पूरक शाळा, वृक्ष संवर्धन, क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा, आय सी टी पायाभूत सुविधा, शैक्षणिक साधनसामग्री, दृकश्राव्य साधने, अडथळा मुक्त वातावरण, शालेय आनंददायी वातावरण, बोलक्या भिंती, रंगरंगोटी, शालेय सजावट, परसबाग विकास व उपयुक्तता, विद्यार्थी लाभाच्या विविध योजना याबाबत केलेली जनजागृती, लोकसेवा हमी मधील सेवा आणि माहिती अधिकार या बाबींची तपासणी होणार आहे.
शासन ध्येयधोरणे अंमलबजावणी
शासन ध्येय धोरण व अंमलबजावणीमध्ये आधार वैधता, सरलप्रणाली उपयोग माहिती अद्ययावतीकरण, यु-डायस प्रणाली वरील नोंदी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्रसहभाग, महावाचन चळवळ, मागील वर्षी घेण्यात आलेल्या अभियानांतर्गत मधील शपथ, ग्रीनिज वर्ड रेकॉर्ड मधील सहभाग, शासकीय कार्यक्रमातील सहभाग, मेरा देश मेरी माटी, ग्रंथालयांचा उपयोग, पाठ्यपुस्तक, विद्यार्थी मूल्यमापन चाचणी आयोजन, स्त्री पुरुष समानता, मतदान प्रचार प्रसार, विविध महत्त्वपूर्ण विषयांच्या शपथी कार्यक्रम, गणवेश वाटप, तंबाखू मुक्त भारत, कुष्ठरोग निर्मूलन, आनंददायी शनिवार, व्यवहार ज्ञान, कृषी घटक, विविध शासकीय सवलती, शिष्यवृत्ती योजना पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी केलेले प्रयत्न, मतदान प्रचार प्रसार निवडणूक साक्षरता मंच व स्काऊट गाइड उपक्रम, शालेय विविध समित्या शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, शिक्षक शाळा सुधारणा, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन विकास समिती, शाळा विकास आराखडा, तक्रार निवारण यंत्रणा, अन्य महत्त्वाच्या समित्या कामकाज, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे धोरण, विद्यांजली पोर्टल, शासकीय यंत्रणेत सर्व माहिती अचूक वेळेत सादर करणे, पर्यावरण विषयक जनजागृती कार्यक्रम, आरोग्य स्थिती, विद्यार्थी अभिलेखाचे नीटनेटके व अध्यायवतीकरण स्थिती, शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ व अभिलेख अद्ययावतीकरण स्थिती, शालेय परसबागांचा विद्यार्थी क्षमता विकासासाठी उपयोग, मागील दोन वर्षांच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्या वाढ, पट नोंदणी पूर्व प्राथमिक शिक्षणातील सहभाग, गळती कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न, रजेवर व रिक्त असलेल्या शिक्षक पदांचा कार्यभार विभागणी व अंमलबजावणी, पात्र विद्यार्थी लाभार्थ्यांची शिष्यवृत्ती सवलत योजना बाबतची सद्यःस्थिती, शाळेने परिसरातील असाक्षरता दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न, असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण, स्वयंसेवक नियुक्ती, असाक्षर व्यक्तींचे अध्ययन अध्यापन साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार या बाबींची तपासणी करण्यात येणार आहे.
शैक्षणिक संपादन :
शैक्षणिक संपादनामध्ये विषयनिहाय विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती साध्यता, इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती, लाभार्थी, स्वच्छता मॉनिटर मधील मागील वर्षाची कामगिरी व चालू वर्षातील सहभाग राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थी संख्या, सांस्कृतिक क्षेत्रातील सादरीकरण, स्पर्धा परीक्षा मधील सहभाग, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अध्ययनासाठी केलेली प्रयत्न, शालेय स्तरावरील विविध स्पर्धा आयोजन, अध्ययन अक्षम, अभ्यासात मागे राहिलेली दिव्यांग मुले, शालेय विद्यार्थी उपस्थिती, ऐतिहासिक वास्तु जतन, वैज्ञानिक दृष्टिकोन, विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य पुरस्कार, तालुकास्तर, जिल्हा स्तर, विभाग स्तर, राज्य स्तर, राष्ट्रीय स्तर, इयत्ता निहाय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची
मागील वर्षातील अध्ययन संपादनणूक पातळी स्तर, इयत्ता दहावी बारावी, पाचवी आठवी आणि इतर विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाह टिकून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न, विविध शिष्यवृत्ती, सानुग्रह अनुदान, शैक्षणिक सवलत योजनांचा विद्यार्थ्यांना मिळालेला लाभ या बाबींची शाळांची तपासणी करण्यात येणार आहे.
तालुका स्तरावरील पथकामार्फत खळद (ता. पुरंदर) येथील गोटेमाळ वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेची तपासणी प्रक्रिया (ता.३०) पार पडली. यावेळी राजेवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख बाळासाहेब कोलते, न्यू इंग्लिश स्कूल पांगारे हायस्कूलचे मुख्याध्यापक साधू मेमाणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी आंबळे येथील प्राथमिक शिक्षक संतोष बोरकर यांनी या बाबींची तपासणी केली. शाळेतील शिक्षक नंदकुमार चव्हाण, संजीव साबळे यांनी वरील बाबींचे दस्तऐवज पुरावे तपासणी पथकासमोर सादर केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.