पुणे

पावसामुळे खळद परिसरात घरांची पडझड

CD

खळद, ता. ३० : आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे खळद परिसरात शेत शिवारामध्ये पाणी साचले आहे. गावातील काही घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. या पडझडीची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
यावर्षी प्रथमच मे महिन्यामध्ये नदीला पाणी आले आहे. यामुळे येथील शेतकरी सुखावला आहे. सध्या गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई असून शासकीय टँकरने येथे पाणीपुरवठा होतो. मे महिन्यातच नदीला पाणी आल्यामुळे हा प्रश्‍न मार्गी लागेल असे दिसत आहे.
नदीच्या पाण्याने शेतकरी सुखावला असला तरी वारंवार येणाऱ्या पुरामुळे नदीलगत असणाऱ्या घरांना नदीच्या पुराचे पाणी लागून घरांची दुरवस्था झाली आहे. नदीलगत राहणारे ग्रामपुरोहित बाळासाहेब गुरव यांच्या घराची भिंत या पावसात पडली असून त्याचे नुकसान झाले आहे. नदीला महापूर आल्यास त्यांच्या घरात पाणी जाऊन घर वाहून जाण्याची भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
याबाबत शासनाच्या आदेशाची वाट न पाहता ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार तलाठी सतीश उमाप, ग्रामसेवक महेंद्र लोणकर, कृषी सहाय्यक स्वाती यादव, सरपंच संदीप यादव, सदस्य योगेश कामथे, शिवाजी कामथे, कैलास खळदकर यांनी येथे भेट देऊन याची पाहणी केली. नुकसानग्रस्त भागाचा त्याचप्रमाणे गावातील इतर पडझड झालेल्या घरांचाही पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी हे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेतल्यामुळे संबंधितांनी समाधान व्यक्त केले आहे.

गावोगावी पावसाचे प्रमाण वेगवेगळे आहे. मात्र पावसाची नोंद होताना मंडल विभागनिहाय होते. ज्या गावात पर्जन्यमापक यंत्र आहे येथील पावसाच्या नोंदीनुसार संपूर्ण मंडल क्षेत्राच्या नुकसान भरपाईचा विचार केला जातो. ज्या गावात पर्जन्यमापक नाही तेथे अतिवृष्टी झाली आहे, त्यांना या नोंदीचा फटका बसत आहे. तरी शासनाने नुकसान भरपाई निकषांत बदल करून गावोगावी प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करून भरपाई द्यावी.
योगेश कामथे, ग्रामपंचायत सदस्य, खळद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking: आधी नाच मग पाणी देतो...! शिक्षकांचा आग्रह, पाण्यासाठी तहानलेली मुले पोहोचली रुग्णालयात, काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : सायनमध्ये MTNL ची केबल चोरी १४ आरोपी पोलिसांच्या ताब्यात, परंतू मास्टरमाइंड फरार

पुतीन ज्या देशात जातात, तिथे पोर्टेबल टॉयलेट घेऊन जातात....काय आहे यामागचं खरं कारण?

Tejashri Pradhan Divorce : माझ्या नवऱ्यासोबत काम करायला मिळालं हे माझं नशीब; पण एका अटीने...घटस्फोटाआधी काय म्हणाली तेजश्री प्रधान?

Ajit Pawar Video: ''माझ्यामुळेच तू आमदार झालास'', अजित पवारांची जाहीर कार्यक्रमात रोहित पवारांना कबुली

SCROLL FOR NEXT