खळद, ता .१: वाळुंज (ता. पुरंदर) येथे कृषी दिनी नितीन इंगळे शेतात शिवारफेरी काढण्यात आली होती. पुरंदर तालुक्यातील सर्व कृषी अधिकाऱ्यांनी नितीन फूड्स या प्रक्रिया उद्योगाला भेट दिली व ड्रॅगन शेतीची माहिती घेतली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, मंडल कृषी अधिकारी अनिल धुरगुडे, चंद्रकांत धायगुडे, महेश कचरे, अमोल सुतार, महेंद्र गिरमे, प्रवीण आडसुळ, निकेतन दापटे, दशरथ ढवळे, उदयंत वाघोले, सचिन जगताप, रणजित गुळवे, स्वाती यादव, मयूरी नेवसे, स्नेहलता जाधव, प्रीती जगताप, उपकृषी अधिकारी संदीप कदम, गणेश जगताप, रवींद्र खेसे, माधवी नाळे, सहाय्यक कृषी अधिकारी अतुल हिंगणे, संदेश समगीर, नंदकुमार विधाते, योगेश पवार, विजय जाधव, आशिष गायकवाड, कोंडिबा जरांडे, विजय टेकवडे, संतोष कामथे, सविता इंगळे, रोहन इंगळे इत्यादीसह सर्व सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी मित्र उपस्थित होते.
दरम्यान, नितीन इंगळे यांनी आपल्या मेहनत व जिद्दीच्या जोरावर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत प्रक्रिया उद्योगात भरारी घेतली आहे .५० हजारांपासून सुरू केलेल्या त्यांच्या व्यवसायाची अवघ्या ७ ते ८ वर्षांत तीन ते चार कोटींची उलाढाल होत आहे. त्यांनी राज्यातीलच नव्हे तर परराज्यातील ग्राहकांनाही आकर्षित केले आहे.
आंबा, जांभूळ, सीताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, अंजीर आदींवर प्रक्रिया होत आहे. मात्र सध्या फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे प्रक्रिया उद्योग अडचणीत आले आहेत, उत्पादनात घट होत आहे यासाठी शासनाने फळमाशी निर्मूलनासाठी सामुहिक कीड निर्मुलन मोहीम राबविण्याची गरज आहे.
- नितीन इंगळे, नितीन फूड्स प्रक्रिया उद्योग चालक.
03127
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.