खळद, ता. २६ : खळद (ता. पुरंदर) येथे शिवशंभो माध्यमिक विद्यालय, ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने संविधान दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
यानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढत संविधानाचे पालन करूया, संविधान हेच राष्ट्र, आपला भारत आपला, आपलं संविधान, भारत माता की जय च्या घोषणा देत संविधानाप्रती आदर व्यक्त केला.
यावेळी मुख्याध्यापक हरिभाऊ टापरे, माया ताकवले, कृषी सहाय्यक स्वाती यादव, योगेश कामथे, संदीप खळदकर, योगेश कामथे, सूरज कुंभार, दिलीप जगताप, चेतन कामथे, संदीप लव्हे यांच्यासह अनेक तरुण उपस्थित होते.
03373
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.