पुणे

सेंट जोसेफ स्कूलला ‘सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार’

CD

खळद, ता. २५ : खळद (ता. पुरंदर) येथील सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेला एज्यू कनेक्ट इनतर्फे सन २०२५–२६चा ‘सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुणे जिल्हा स्तरावर मिळालेला हा मान शाळेसाठी अभिमानास्पद ठरला आहे.
एज्यू कनेक्ट इन हा देशातील क्रमांक १ शाळा शोध व्यासपीठ म्हणून ओळखला जातो. देशभरातील १५ लाखांहून अधिक शाळांची माहिती या व्यासपीठावर उपलब्ध असून, डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत ‘सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार’ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत हजारो शाळांनी सहभाग घेतला, तर २ लाखांहून अधिक पालकांनी आपला अभिप्राय नोंदवून मूल्यमापन प्रक्रियेत सहभाग घेतला.
या स्पर्धेत शाळांचे मूल्यमापन तांत्रिक उत्कृष्टता आणि पालकांचा अभिप्राय या प्रमुख निकषांवर करण्यात आले. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पुणे जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ९७५ शाळांचे परीक्षण करण्यात आले. त्यामधून सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल, खळद ही शाळा अव्वल क्रमांकाच्या शाळांमध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी ठरली.
या उल्लेखनीय यशाबद्दल व्यवस्थापिका सिस्टर एलियामा, संचालक नेल्सन पिंटो, मुख्याध्यापिका अनुराधा पोरे, उपमुख्याध्यापक महेश भालेराव शाळेचे विद्यार्थी, पालक, शिक्षक व कर्मचारी यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
या यशामुळे खळद- पुरंदर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या अभिमानात भर पडली असून, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पालकांचा विश्वास या बळावर शाळेने मिळवलेला हा सन्मान शाळेच्या भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना मुख्याध्यापिका अनुराधा पोरे यांनी यावेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune HeatWave: पुणेकरांना उष्म्याच्या झळा! महापालिका रुग्णालयांत ७७० जणांवर उपचार, एप्रिलमध्ये तापमान ४० अंशांच्या अंशांपलीकडे..

Latest Marathi News Live Update : पुणेकरांनो काळजी नसावी! आज पाणी पुरवठा बंद राहणार नाही

Parliament Special: संसदेचं अधिवेशन वादळी ठरणार! मतांची जुळवाजुळव करण्याचं आव्हान, केंद्र सरकार ३६० खासदारांचा पाठिंबा कसा मिळवणार?

Mahabaleshwar incident: प्राचीन कृष्णाबाई मंदिराच्या छताचा भाग कोसळला; महाबळेश्वरमधील पंचनद्यांचे उगमस्थान,'पुरातत्त्व'च्या दुर्लक्षपणामुळे नेमकं काय घडलं!

Summer Heat Increase : राज्य आता ‘रेड’झोनमध्ये; उष्णतेच्या लाटेचा प्रकोप वाढला

SCROLL FOR NEXT