पुणे

ग्रामसचिवालय इमारतीची कडूस ग्रामस्थांची मागणी

CD

कडूस, ता. २८ : किरकोळ शासकीय कामासाठी नागरिकांना तालुक्याच्या गावी हेलपाटे मारावे लागत असल्याने एकाच छताखाली विविध शासकीय कार्यालयांची सोय व्हावी, यासाठी कडूस (ता. खेड) येथे ग्रामसचिवालयाची सुसज्ज इमारत उभारावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच हेमलता खळदकर व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली.
लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीने कडूस गाव खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सर्वात मोठे गाव आहे. पश्चिम पट्ट्यातील गावांमधील नागरिकांचा कडूस गावात नित्याचा वावर आहे. बाजारपेठेचे गाव असताना कडूसमध्ये मात्र एकही शासकीय अथवा निमशासकीय कार्यालय स्वतःच्या जागेत नाही. नागरिकांना किरकोळ शासकीय कामासाठी तालुक्याच्या गावी जावे लागते. महसूल, कृषी, पोलिस विभागासह अन्य कामांसाठी नागरिकांना वेळेसह पदरमोड करीत राजगुरुनगर गाठावे लागते.
कडूस गावात एकाच छताखाली सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये आणल्यास पश्चिम पट्ट्यातील नागरिकांची वेळेसह पैशांची बचत होणार आहे. ही सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी कडूस गावात सर्व सोईसुविधांयुक्त ग्रामसचिवालयाची इमारत होणे गरजेचे आहे. यासाठी सरपंच हेमलता खळदकर, उपसरपंच रंजना पानमंद व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामविकास मंत्री गोरे यांना साकडे घातले आहे. ग्रामविकास अधिकारी सुरेश घनवट, सामाजिक कार्यकर्ते अक्षय खळदकर, नामदेव शेंडे यांनी ग्रामसचिवालय इमारत मागणीचे पत्र ग्रामविकास मंत्री गोरे यांना दिले. यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत इमारत मंजुरीचे आश्वासन दिल्याचे सरपंच खळदकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : ठाकरे मेळाव्यावर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT