पुणे

‘सिल्कबेरी’चा सहकारमंत्र्यांच्या हस्ते गौरव

CD

कडूस, ता. २५ : रेशीम शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेड तालुक्यातील सिल्कबेरी फेड फार्मर प्रोड्युसर कंपनीला केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते इक्वीटी ग्रॅण्ट निधीचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. मुंबई येथे शुक्रवारी (ता.२०) पार पडलेल्या सहकारातून समृद्धी या कार्यक्रमामध्ये गौरव करण्यात आला.
देशातील सहकारी चळवळीला बळकटी देण्यासाठी, तळागाळातील लोकांपर्यंत सहकार वाढविण्यासाठी आणि सहकारी संस्थांची कार्यक्षमता, उत्पादकता आणि नफा वाढविण्यासाठी, सहकार मंत्रालयाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमांतर्गत केंद्र शासन
‘सहकार से समृद्धी’ ही योजना राबवीत आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या १९ जून २०२४ च्या आमसभेत २०२५ हे ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला गेला. या उपक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष २०२५ निमित्त मुंबई येथे कार्यक्रम पार पडला. यामध्ये नाफेड व सिबिबीओ सीमासेस लर्निंग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या सिल्कबेरी फेड फार्मर प्रोड्युसर या खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी समूह शेतीतून उभ्या केलेल्या कंपनीला गौरविण्यात आले. कंपनीने शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योग व रेशीम शेतीसाठी लागणारे कृषी निविष्ठा केंद्र, आठवडे बाजार अशा विविध संकल्पना उभ्या करून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न केले आहेत. गेल्या पाच वर्षात कंपनीने भरीव कामगिरी केली आहे. या कामगिरीबद्दल सिल्कबेरी कंपनीची निवड झाली. अल्प कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातून हा बहुमान पटकवण्याची कामगिरी या कंपनीने केली आहे.
यावेळी सिल्कबेरी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर विजय सुनील गारगोटे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इक्वीटी ग्रॅण्ट निधीचा धनादेश स्वीकारला. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्य कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व मान्यवर उपस्थित होते.


01791

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

मुंबईत २ लाख ट्रक चालक-मालक धडकणार, ई-चालान प्रणालीविरोधात उतरणार रस्त्यावर

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune Fraud : मेट्रोसाठी सिमेंट-स्टील पुरवठ्याच्या आमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

Kamthi News : नागपूर हादरल! रंग उडवल्याच्या रागातून आजीने नातवावर ओतले उकळते पाणी

SCROLL FOR NEXT