कळस, ता. ३ : अन्न पोषण व सुरक्षा अभियानातंर्गत इंदापूर तालुक्यात रब्बीतील ज्वारी, मका, हरभरा, व उसातील अंतरपिकातील हरभऱ्यासाठी निविष्ठा मोफत पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर यांनी दिली.
कळस (ता. इंदापूर) येथे अन्न पोषण व सुरक्षा अभियानातंर्गत पौष्टिक तृणधान्य योजनेतून शेतकऱ्यांना मोफत ज्वारीचे बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी शासकीय योजनांची माहिती दिली.
ते पुढे म्हणाले, अन्न पोषण व सुरक्षा अभियानातंर्गत पौष्टिक तृणधान्य योजनेतून तालुक्यातील सुमारे ४५० हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचे प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. यामध्ये सुमारे १२०० शेतकऱ्यांची निवड केली जाणार असून, त्यांना मोफत बियाणे व निविष्ठांचे वाटप केले जाणार आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने बीबीएफ यंत्राणे पेरणी करून निविष्ठा देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतातील पिकांचे संगोपन करणे गरजेचे आहे.
भिगवण येथील महाराष्ट्र अॅग्रो एजन्सी, सणसर येथील श्रीराम कृषी सेवा केंद्र व इंदापूर येथील कृषी संपदा या दुकानात उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी आधार कार्ड व सात बारा, आठ अ उतारा घेऊन अनुदानावर बियाणे खरेदी करण्याचे आवाहन रूपनवर यांनी केले.
कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक गोपाळ खंडागळे, कृषी सेविका नेहा टिळेकर, सुनील ओमासे, श्याम धायतोंडे, विजय गावडे, संजय राऊत, दिलीप खटके यांसह शेतकरी उपस्थित होते.
02700
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.