कळस, ता. ७ : इंदापूर तालुक्यातील धाकटे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बुधवारी (ता. ११) भजन स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हरिश्चंद्र माने यांनी दिली.
माने म्हणाले, ‘‘दरवर्षी गोसावी गुरुजी आणि श्रीरंग माने यांच्या पुण्यतिथीनिमित्त या भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्याबरोबर बाहेरील अनेक भजनी मंडळ या स्पर्धेमध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेतात. सुरवातीला गोसावी गुरुजींच्या पुण्यातिथीनिमित्त सकाळी १० वाजता बाबामहाराज खारतोडे यांचे फुलांचे कीर्तन होईल. यानंतर दुपारी १२ वाजता भजन स्पर्धेला सुरवात होईल. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत स्पर्धा चालेल. त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. ज्या भजनी मंडळांना स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी देवस्थान ट्रस्टचे सचिव मोहन काळे मोबाईल ७७०९४६४०६० व ज्ञानदेव गावडे ९०६७०४४९०९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन माने यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.