पुणे

काळेवाडीत ट्रकला धडकून पिकअपचा चालक जखमी

CD

पळसदेव, ता. ४ : पुणे- सोलापूर महामार्गावर काळेवाडी क्र. १ (ता. इंदापूर) येथे मंगळवारी (ता. ४) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पिकअपची पुढे चाललेल्या ट्रकला धडक बसली. या अपघातात पिकअपचा चालक जखमी झाला. विठ्ठल याडाहल्ली प्रसाप्पा (वय ३५, रा. गोविंद कोप, तुलसी गिरी, बागलकोट, कर्नाटक), असे त्याचे नाव आहे. त्याला भिगवण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
याबाबत महामार्ग पोलिसांनी माहिती दिली की, सोलापूरकडे चाललेल्या ट्रकला (क्र. एम.एच.१२ एस. एक्स. ७०९७) काळेवाडी गावच्या हद्दीत पाठीमागून आलेल्या पिकअप जीपची (क्र. के.ए.२९ सी. ३१२४) जोरदार धडक बसली. या अपघातामध्ये पिकअप ट्रकमध्ये अडकली. त्यात पिकअपचा चालक जखमी झाला. महामार्ग पोलिस, एनएचएआयचे जवान व क्रेनच्या साह्याने चालकाला बाहेर काढून वाहने बाजूला घेण्यात आली. जखमी चालकाला खासगी रुग्णवाहिकेतून भिगवण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT