पुणे

बाजारभावामुळे वाढली द्राक्षाची गोडी

CD

पळसदेव, ता. २० : द्राक्ष हंगामास पोषक वातावरण राहिल्याने यंदाचा द्राक्ष हंगाम उत्पादकांना अच्छे दिन आणणारा ठरला आहे. द्राक्षाच्या खरड छाटणी दरम्यान दूषित वातावरणाचा परिणाम काडीच्या परिपक्वतेवर झाल्याने यंदा उतार कमी बसला असला तरी उत्पादकांना द्राक्षाच्या बाजारभाव वाढीने खूष केले आहे.

कमी उत्पादनातही अपेक्षेप्रमाणे चांगले उत्पन्न मिळाल्याने गेल्या पाच-सहा वर्षांत कायम तोट्यात गेलेल्या द्राक्ष उत्पादकांची कसर यंदा भरून निघाली असल्याचे बोलले जात आहे. इंदापूर तालुका काळ्या जातीची द्राक्ष निर्यात करणारा राज्यात पहिल्या क्रमांकाचा तालुका ठरला आहे. तालुक्यातून यंदाच्या हंगामात आतापर्यंत सुमारे २०० कंटेनरच्या माध्यमातून २ हजार ६०० टन द्राक्षाची निर्यात झाली आहे.

इंदापूरमध्ये सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली आहे. यातून सुमारे ६० हजार टन द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. यामुळे द्राक्षाच्या हंगामात सुमारे २०० कोटींहून अधिकची उलाढाल होते.

या वाणाची लागवड
- नानासाहेब पर्पल
- कृष्णा सिडलेस
- नारायणगांव जम्बो०
- आर. के.
- माणिक चमण
- सुपर सोनाक्का
- एसएसएन

गतवर्षीच्या द्राक्षे पाठविण्यात दुपटीने वाढ
पिकणाऱ्या काळ्या जातीच्या जम्बो वाणाला परदेशात चांगली मागणी आहे. दुबई, चीन, मलेशिया, थायलंड यांसारख्या देशात येथील द्राक्षाला पसंत केले जाते. यामुळे दरवर्षी येथून व्यापाऱ्यांकरवी मोठ्या प्रमाणावर द्राक्ष परदेशात पाठविली जाते. यंदा हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत दुप्पटीने वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत.

यंदा मिळालेला बाजारभाव
१. यंदा निर्यातक्षम काळ्या जम्बो द्राक्षाला १२५ ते १५० रुपये प्रतिकिलोपर्यंत बाजारभाव मिळाला आहे.
२. पांढऱ्या निर्यातक्षम द्राक्षाला ७० ते ९० रुपयांपर्यंत प्रतिकिलो बाजारभाव मिळाला.
३. स्थानिक बाजारात काळी द्राक्ष ९० ते १०० रुपये प्रतिकिलोने विकली गेली आहे.
४. पांढऱ्या द्राक्षालाही ५० ते ७० रुपये मिळाले.

गेल्या काही वर्षांपासून द्राक्ष पिकात कायम तोटा घेणाऱ्यांना यंदाच्या हंगामात द्राक्षाच्या भाव वाढीची गोडी अनुभवायला मिळाली आहे. यंदाचे द्राक्ष बाजार गेल्या पाच ते सहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. उत्पादनात पन्नास टक्क्यांपर्यंत घट झाली असली, तरी शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले आहे. एप्रिल अखेरपर्यंत इंदापूर तालुक्यातील हंगाम सुरू राहील, यातून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळेल.
- गणेश सांगळे,पुणे जिल्हा मानद सचिव, राज्य द्राक्ष बागायतदार संघ

इंदापूर तालुक्यातील काळी द्राक्ष निर्यात होण्याचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. येथील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या द्राक्षाला परदेशात चांगली मागणी आहे. आतापर्यंत सुमारे २०० कंटेनरच्या माध्यमातून २ हजार ६०० टन द्राक्ष परदेशात निर्यात करण्यात आली आहे. यातून शेतकऱ्यांच्या घामाचा योग्य दाम यंदा मिळाल्याचे समाधान शेतकऱ्यांमध्ये आहे.
- भाऊसाहेब रूपनवर, तालुका कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT