पुणे

गुलाबाचे कलम करण्यात शेतकरी व्यग्र

CD

कळस, ता. ४ : कळस (ता. इंदापूर) परिसरातील शेतकरी गुलाबाच्या रोपवाटिका निर्मिती करण्यावर भर देत आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर गुलाबाची रोपे विक्रीस उपलब्ध व्हावीत, यासाठी रोपवाटीकाधारक शेतकरी कलम करण्यात व्यग्र आहेत. येथील गुलाबाची रोपे मोबाईल अॅपमुळे देशभर पोचली आहेत.
बोर्डो, डिवाइन, ग्लॅडेटर, सुपरस्टार अशा वीसहून अधिक प्रकारच्या जातीच्या गुलाबाची रोपे येथे तयार केली जातात. कलम केलेल्या काडीतून नवीन अंकुर फुटल्यानंतर हक्काचे चार पैसे पदरी पडण्याची शाश्वती या शेतकऱ्यांना असते. यामुळे एकीकडे सूर्य आग ओतत असताना दुसरीकडे तात्पुरत्या तयार केलेल्या आडोशाला बसून कलम बांधणारे कारागीर गुलाबाच्या काडीत डोळे भरत आहेत. आगामी तीन-चार महिने हे काम सुरु राहणार असून, ग्राहकांच्या मागणीनुसार रोपे तयार करण्याकडे या शेतकऱ्यांचा कल असतो.

वर्षभरात ५० लाख रोपांची निर्मिती
कळस परिसरात गुलाबाची रोपे तयार करणाऱ्या लहान-मोठ्या तीस ते चाळीस रोपवाटिका आहेत. या रोपवाटीकाधारकांकडून कमी -अधिक प्रमाणात गुलाबाच्या रोपांची निर्मिती केली जाते. वर्षभरात सुमारे ५० लाख रोपांची निर्मिती येथील रोपवाटीकाधारकांकडून केली जाते. तयार केलेली रोपे मागणीनुसार शेतकरी व व्यापाऱ्यांना पुरवली जातात.

रोपांची मोबाईल अॅपव्दारे विक्री
कळस परिसरातील शंभराहून अधिक तरुण डोळा भरण्याच्या कामात (कलम करणे) पारंगत झालेले आहेत. यामुळे या तरुणांना येथे हक्काचा रोजगार मिळाला आहे. शेतीसाठी पाण्याचा शाश्वत आधार नसल्याने, कमी क्षेत्रात चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या रोपवाटीकांची निर्मिती या शेतकऱ्यांनी केली आहे. तयार केलेल्या रोपांची विक्री व्यापारी, शेतकरी यांबरोबर मोबाईल अॅपव्दारे केली जाते. यामुळे येथील रोपे देशभर पोचली आहेत. उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात येथील गुलाबाच्या रोपांना सर्वाधिक मागणी आहे. तर कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्यात गुलाबाबरोबर येथील अंजीर व डाळींबाच्या रोपांना चांगली मागणी असल्याचे रोपवाटीकाधारक सांगतात.

रोपवाटिकाधारक दिनेश गावडे म्हणाले...
१. गुलाबाच्या काडीत डोळा भरण्यात पारंगत असलेल्यांना येथे मागणी आहे.
२. परिसरातील सुमारे १२५ लोक डोळा भरण्याच्या कामात पारंगत झालेले आहेत.
३. उन्हाळ्यात व दिवाळीनंतर कलम करण्याचे काम केले जाते.
४. रोपांच्या मागणीनुसार निर्मिती करण्यावर आमचा भर असतो.
५. चांगल्या दर्जाच्या रोपांची निर्मिती करण्यासाठी आवश्यक बाबींची काळजी घेतो.
६. गुलाब शेतीवर सुमारे ५०० लोकांचा चरितार्थ यावर अवलंबून

रोपवाटीकाधारक शेतकरी व व्यापारी यांना रोपांची विक्री करतात. परंतु सध्या आधुनिक काळात पारंपरिक रोप विक्रीबरोबर नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकरी करत आहेत. मोबाईलमधील अप्लीकेशनच्या माध्यमातून रोपांची विक्री केली जाते. मागणीनुसार पुरवठा केला जात असल्याने, येथील रोपे देशभरात पोचली आहे. अनेक खरेदीदार रोपांची आगाऊ मागणी नोंदवितात. यामुळे येथील तरुणांना हक्काचा रोजगार मिळाला आहे.
- महेश पानसरे, भैरवनाथ नर्सरी


02943

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 : राज्यात १ मे पासून जनगणना, विचारले जाणार 'हे' प्रश्न; चुकीची माहिती दिल्यास होणार तब्बल 'इतका' दंड

Latest Marathi News Live Update : पाषाण तलावातील मृत मासे प्रकरण! महापौरांचा दौरा, प्रदूषण रोखण्यासाठी तातडीचे आदेश

गरोदर असूनही ‘राका’मध्ये दिसणार दीपिका पादुकोण करणार अ‍ॅक्शन सीन ! अभिनेत्रीची विशेष मेहनत

‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’मध्ये मराठमोळ्या श्वेता साकोडेची दमदार एन्ट्री; महाराष्ट्रीयन पदार्थांनी जिंकली परीक्षकांची मनं

Management Education: मॅनेजमेंट शिक्षणातील 'जेंडर गॅप': महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी बिझनेस स्कूल्स उचलत आहेत मोठी पावले

SCROLL FOR NEXT