पुणे

शुक्रवारी बिरंगाई देवीची आषाढी यात्रा

CD

कळस, ता. ७ : बिरंगुडी (ता. इंदापूर) येथील बिरंगाई देवीची यात्रा शुक्रवारी (ता. ११) भरणार आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती यात्रा समितीने दिली.यात्रेनिमित्त मंदिर परिसराची स्वच्छता, सुशोभीकरण, मूर्तींचे रंगकाम, दिवाबत्ती, शुद्ध पिण्याचे पाणी पुरविणे यांसारखी कामे केली जात आहेत.
नवसाला पावणारी देवी म्हणून बिरंगाई देवीची ख्याती परिसरात आहे. यात्रेसाठी पुणे जिल्ह्यासह सातारा, नगर, मुंबई येथील भाविक दरवर्षी यात्रेसाठी आवर्जून उपस्थिती लावतात. यात्रेदरम्यान भाविकांकडून नवसाची परतफेड केली जाते. यंदा आषाढी पौर्णिमा झाल्यानंतर शुक्रवारी यात्रा भरणार आहे. यात्रेदिवशी सकाळी देवाची पकाळणी, अभिषेक व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्यावतीने देवीला मानाचा पोशाख, विहिरीला नारळ अर्पण व मंदिरात भक्तांचा भाकणुकीचा कार्यक्रम होईल. यानंतर दिवसभर नवसाच्या परतफेडीचा कार्यक्रम होईल. सायंकाळी शबनम पुणेकर यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard In Kolhapur : पन्हाळगड पायथ्याजवळ आढळला मृत बिबट्या, कारण अद्याप अस्पष्ट

Donald Trump : दिवाळीआधी डोनाल्ड ट्रम्प यांचं भारताला खास गिफ्ट; 'या' क्षेत्रातील कंपन्यांना होणार फायदा

Narak Chaturdashi 2025 Zodiac Prediction: नरक चतुर्दशीच्या दिवशी कन्यासह 'या' दोन राशींचा सुरू होईल गोल्डन टाइम

Latest Marathi News Live Update : महावितरणचा राज्यव्यापी संप सुरु

Pakistan Semi Final Scenario ODI WC : पाकिस्तानी संघावर टीम इंडियाच्या हाता पाया पडण्याची वेळ; तीन सामन्यांत उतरला सर्व माज...

SCROLL FOR NEXT