पुणे

कळसमधील विद्यार्थी ३७ वर्षांनंतर पुन्हा रमले आठवणीत

CD

कळस, ता. १२ ः कळस (ता. इंदापूर) येथील श्री हरणेश्वर विद्यालयात सन १९८८ मध्ये दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. तब्बल ३७ वर्षांनंतर वयाची पन्नाशी ओलांडलेल्या या विद्यार्थ्यांनी एकत्रित येत शालेय आठवणींना उजाळा दिला.
ग्रामीण भागात शिक्षणाला फारसे महत्त्व नसलेल्या या काळातील विद्यार्थ्यांनी शाळेशी जोडलेली नाळ कायम ठेवल्याचे सिद्ध केले. ज्या शाळेत शिक्षणाचा श्री गणेशा केला त्याच शाळेतील बालसवंगड्यांना एकत्रित करण्याचा योग पुन्हा जुळून आल्याची बाब कौतुकास्पद असल्याचे मत प्रास्ताविकात जवाहरलाल सातपुते यांनी व्यक्त केले.
भिगवण (ता. इंदापूर) येथील हॉटेलच्या सभागृहात हा स्नेहमेळावा नुकताच पार पडला. हलगीचा निनाद, फुलांचा वर्षाव करत व एक फळाचे झाड देवून मार्गदर्शक शिक्षक इंद्रभान कळमकर, विलास चांदगुडे, रामचंद्र करे यांचे स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी उपस्थित माजी शिक्षक व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक तानाजी कांबळे, गिरिजा गावडे, रवींद्र शहा, नारायण पाटील, धनाजी सांगळे, हनिफ मुलाणी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. तानाजी खोमणे यांनी सूत्रसंचालन केले. संजय दगडे यांनी आभार मानले.

03102

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protests: नेपाळची संसद विसर्जित; सुशीला कार्की अंतरिम पंतप्रधान

Shiv Sena UBT Demand : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंच्या पक्षाने केली मोठी मागणी!

SSC Exam Form : दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून होणार सुरू

Vasmat Heavy Rain : वसमतला ढगफुटी सदृश्य पाऊस! शेतशिवाराला नद्यांचे स्वरूप; आखाडे गेले वाहून, पाच गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates Live : न्यायाधीशांच्या कारला आग, सुदैवाने इजा नाही

SCROLL FOR NEXT