Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 28 October 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

भुजबळांची प्रकृती स्थिर, जनसंपर्क कार्यालयाकडून स्पष्टीकरण

मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे.

जैन मंदिरासंदर्भात धर्मादाय आयुक्तांकडे सह आयुक्तांनी सादर केला अहवाल

पुणेः मॉडेल कॉलनीतील ‘शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट’मध्ये एक हजार ४५२ चौरस फूट जागेत भगवान दिगंबर जैन महावीरांचे मंदिर असून, तेथे जैन समाजाचे नागरिक दर्शनासाठी येतात, असा अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे पुणे विभागाच्या सह आयुक्तांनी सादर केला आहे.

महापालिकेतर्फे मेट्रो प्रवाशांसाठी बाणेर-बालेवाडीत चार पार्किंग

पुणे: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा पुढील तीन महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मेट्रो वापरावी याचा बाणेर, बालेवाडीतील मेट्रो स्टेशनच्या परिसरात महापालिका चार पार्किंग उभारणार असून, त्यानंतर ते पीएमआरडीएच्या मेट्रोकडे हस्तांतरित करणार आहे.

मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

मंत्री छगन भुजबळ यांच्या छातीमध्ये दुखत असल्याने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

'लॉज'समोरच पत्नीने केली पतीची धुलाई

बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी गावात प्रेयसी सोबत लॉजमध्ये सापडलेल्या पतीला पत्नीने लॉज समोर बेदम चोप दिल्याची घटना चिकोडी शहरातील बसस्थानकापासून जवळ असलेल्या एका लॉजच्या आवारात घडली. अविनाश भोसले नावाचा पती आपल्या प्रियसी सोबत लॉजमध्ये आला होता. ही माहिती त्याच्या पत्नीला समजली. पतीला रंगात पकडण्यासाठी पत्नीने आपल्या मामाला ही सोबत घेतले आणि पती आणि त्याची प्रियसी रंगेहात पकडले गेले. संतापलेल्या पत्नीने कॉलर धरत चपलाने पतीला बेदम मारहाण केली. मामानेदेखील त्याची चांगलीच धुलाई केली. पत्नीकडून पतीची धुलाई होत असताना नागरिकांनी मात्र हे पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

Parabhani Live: परभणीत शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांची गाडी दगडाने फोडली

परभणीत शेतकरी संतापलेले पाहायला मिळाले. संतापलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची गाडी दगड मारून फोडली. जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडणाऱ्या शेतकऱ्याला ताब्यात घेतलं आहे.

Pune Live: ऑलिम्पिक महासचिव नामदेव शिरगावकर याच्यावर गुन्हा दाखल

ऑलिम्पिक महासचिव नामदेव शिरगावकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2022 साली गुजरात येथे झालेल्या नॅशनल गेम्स करता महाराष्ट्र शासनाकडून 12 कोटी 45 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. मात्र या निधीचा ताळमेळ लागत नसल्याचा आरोप शिरगावकर यांच्यावर करण्यात आला होता.  ऑडिटमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिरगावकर यांच्यावर करण्यात आला आहे.

Dharashiv Live: धाराशिव- तुळजापूर -सोलापूर रेल्वे मार्गाला 3295 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता

देशभरातील तुळजाभवानीच्या भक्तांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. धाराशिव- तुळजापूर -सोलापूर रेल्वे मार्गाला 3295 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तुळजाभवानीचे तुळजापूर रेल्वेच्या नकाशावर येणार असे परिवहनमंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.

Cyclone Montha: मोंथा चक्रीवादळामुळे ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा, भारताच्या किनारपट्टीवर रेड अलर्ट

मोंथा चक्रीवादळचा भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर प्रभाव वाढत असून तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांच्या किनारी भागांसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तीन दिवस मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.

Ranji Trophy Live: रणजी ट्रॉफीतील मुंबई विरुद्ध छत्तीसगढ सामना अनिर्णित, रहाणे सामनावीर

रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेतील मुंबई विरुद्ध छत्तीसगढ सामना अनिर्णित राहिला आहे. या सामन्यात पावसामुळे खूपदा अडथळा आला होता.मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ४१६ धावा ठोकल्या होत्या. यामध्ये अजिंक्य रहाणेने १५९ धावांची खेळी केली होती. त्यानंतर मुंबईने छत्तीसगढला पहिल्या डावात २१७ धावांवर सर्वबाद करत फॉलोऑन दिला होता. यावेळी छत्तीसगढने ३ बाद २०१ धावा दुसऱ्या डावात केलेला असताना शेवटचा दिवस संपला. त्यामुळे सामना अनिर्णित राहिला. मुंबईने पहिल्या डावातील आघाडीमुळे ३ गुण मिळवले, तर छत्तीसगढला १ गुण मिळाला. रहाणे सामनावीर ठरला.

Mumbai Live: बेस्टच्या पर्यावरणस्नेही इलेक्ट्रीक एसी बसगाड्यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण

बेस्टच्या पर्यावरणस्नेही इलेक्ट्रीक वातानुकूलित बसगाड्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज लोकार्पण झाले.

Mumbai Live : मुंबईत जोरदार पावसाची हजेरी

  • मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे

  • राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस

  • मुंबई शहरात सुद्धा पावसाने हजेरी लावल्याचे दिसून येत आहे

Latur Live : लातूरमध्ये काँग्रेसला खिंडार, मनपाच्या माजी बांधकाम सभापतींचा भाजपात प्रवेश

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडासमोर ठेवून आज मुंबई येथे भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करण्यात आलाय, लातूर जिल्ह्यातून काँग्रेसचे नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती गिरीश पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

तर विधानसभा निवडणुकीत बंडखोरीचा ठपका ठेवत भाजपाने निलंबित केलेल्या गणेश हाके, आणि माजी आमदार बबन खंदारे यांचे देखील निलंबन रद्द करत भाजपाने घर वापसी दिली आहे.

दरम्यान या पक्षप्रवेशाने भाजपाची ताकद वाढली जाणार आहे, तर लातूर शहरात काँग्रेसला मोठ खिंडार पडलय. तर येत्या काळात काँग्रेस मधील अनेकांचा प्रवेश भाजपमध्ये होईल अशी चर्चा शहरात जोर धरू लागली आहे.

Pune Live : ऑलिंपिक महासचिव नामदेव शिरगावकर याच्यावर गुन्हा दाखल

2022 साली गुजरात येथे झालेल्या नॅशनल गेम्स करता महाराष्ट्र शासनाकडून 12 कोटी 45 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता,मात्र या निधीचा ताळमेळ लागत नसल्याचा आरोप शिरगावकर यांच्यावर करण्यात आला होता.

या ऑडिटमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिरगावकर यांच्यावर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या विरोधात पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै संदीप भोंडवे यांच्यासह काही खेळाडु व राज्य क्रीडा संघटना यांनी आंदोलन केले होते.

या आंदोलनामध्ये नामदेव शिरगावकर यांसवर गुन्हा दाखल करुन योग्य तपास करावा अशी प्रमुख मागणी केली होती .

काल अखेर पुणे पोलीसांना महासचिव नामदेव शिरगावकर गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यामुळे आता तपासात काय पुढे येते हे पहावे लागेल..

Nashik Live : दिवाळीची सांगता होताच नाशिकमध्ये दुधाचे दर कोसळले; नागरिकांना दिलासा, म्हशीचे दूध थेट ₹६५-७० वर

दिवाळी पर्वाची सांगता होताच दुधाच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. सुमारे ३० ते ३५ प्रतिलिटर दरात घट झाली आहे. १०० रुपये प्रतिलिटर विक्री होणारे म्हशीचे दूध ६५ ते ७० रुपयांवर विक्री होत आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. भाऊबीजनंतर दिवाळी पर्वाची सांगता झाली. बऱ्याच प्रमाणात नागरिकही आपापल्या गावी रवाना झाले. तसेच मिठाईची मागणीही घटली. त्यामुळे दुधाच्या मागणीतही घट झाली आहे. दैनंदिन विक्री होणारे दुधाचीच मागणी होत आहे. अतिरिक्त मागणी नसल्याने विक्रेत्यांकडूनही दैनंदिन लागणारे तितकेच दूध विक्री उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे दरांमध्ये ३० ते ३५ रुपयांनी घट झाली आहे.

Bhiwandi Live : अवकाळी पावसामुळे भातशेतीचं प्रचंड नुकसान 

भिवंडी ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे अनेक हेक्टर भातशेतीच नुकसान झालं आहे. सलग पावसामुळे तयार झालेले पीक शेतातच भिजून कुजायला लागलं आहे आणि भाताच्या कणसातून नवीन रूपे येत आहेत. याशिवाय कापलेला भातही पुन्हा ओला झाल्यामुळे कुण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं आहे.

Pune Live : जैन हॉस्टेल सुनावणी प्रकरणी ट्रस्टच्या वतीनेही व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात येणार, सूत्रांची माहिती

पुणे जैन हॉस्टेल सुनावणी प्रकरणी अपडेट

ट्रस्टच्या वतीनेही व्यवहार रद्द करण्यास्तही अर्ज दाखल करण्यात येणार, सूत्रांची माहिती

गोखले ग्रुपने व्यवहार रद्द केल्यानंतर आता ट्रस्ट सुद्धा अधिकृत माघार घेणार असल्याची सूत्रांची माहिती

जैन बोर्डिंग संदर्भात धर्मदाय आयुक्त यांच्यासमोर सुनावणी सुरू.

३० ऑक्टोबर रोजी पुण्यातील एच एन डी जैन बोर्डींग हॉस्टेलचा अंतिम निकल जाहीर होण्याची शक्यता

सकल जैन समाजाच्या बांधवांसाठी आनंदाची वार्ता लवकरच

जैन बोर्डींग प्रकरणी धर्मदाय आयुक्तांकडून "स्टे" कायम

एच एन डी जैन बोर्डींग हॉस्टेलचा व्यवहार पूर्णपणे रद्द होण्याची शक्यता

बिल्डर विशाल गोखले पाठोपाठ ट्रस्टींकडून सुद्धा हा व्यवहार रद्द होण्याची शक्यता

30 ऑक्टोबर रोजी दोघांकडून प्रतिज्ञापत्र धर्मदाय आयुक्तांकडे केले जाणार सादर

Beed Live : एसटी प्रवर्गात समावेश न झाल्याने बंजारा समाजातील युवकाने घेतला गळफास; गेवराईतील केकत पांगरी येथील धक्कादायक घटना

गेवराई तालुक्यातील केकत पांगरीच्या युवकाने बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. प्रविण बाबुराव जाधव (वय ३५) रा. केकत पांगरी, ता. गेवराई,जि.बीड असे मृताचे नाव आहे. प्रविण जाधव यांनी आत्महत्येपूर्वी सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात त्यांनी “बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश होत नसल्याने मी आत्महत्या करत आहे.

Mumbai Live : "महायुतीच सगळ्या निवडणुका जिंकणार" - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की,"महायुतीच सगळ्या निवडणूका जिंकणार आहे. त्यांचे सरकार हे स्थगितीचे सरकार आहे आणि आमचं प्रगतीचं सरकार आहे. गेल्या अडीच ते तीन वर्षांमध्ये आम्ही केलेलं काम जनतेसमोर आहे. त्यांना त्यांचा प्रभाव कळला आहे. आम्ही निवडणुकीची तयारी करतोय ते त्यांच्या पराभवाची तयारी करत आहेत."

Dhule Rain: पावसाचा हाहाकार! शिरपूर तालुक्यात मका आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान

सलग दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात मका आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापून ठेवलेल्या मक्याच्या कणसांना कोंब फुटले असून बुरशीही लागली आहे. कपाशी भोवतीची माती सुटी झाल्याने ती उन्मळून पडली आहेत. शेतात पाणी साचल्याने तेथे जाण्यासाठी जागा उरलेली नाही. शिरपूर तालुक्याच्या सातही मंडळात दोन दिवसात सरासरी 40 मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. अतिवृष्टीग्रस्त भागामधून शिरपूर तालुका वगळण्याची जखम ताजी असतानाच या पावसाने केलेले नुकसान त्यावर मीठ चोळणारे ठरले आहे. यामुळे आतातरी शासन आम्हाला दिलासा देईल का? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.

Kolhapur News: इचलकरंजी एसटी आगार मालामाल! दिवाळीत १ कोटी १२ लाख उत्पन्न जमा

इचलकरंजी (Ichalkaranji) एसटी आगाराला दिवाळी सणातील पाच दिवसांत तब्बल १ कोटी १२ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. या कालावधीत तब्बल १ लाख ७४ हजार प्रवाशांनी एसटी सेवेचा लाभ घेतला आहे. यामध्ये ९३ हजार १०० महिला प्रवाशांनी एसटीचा (ST Bus) प्रवास केला आहे. दिवाळीत होणारी गर्दी लक्षात घेवून इचलकरंजी एसटी आगाराने मुंबई, पूणे, सोलापूर, कोल्हापूर आदी मार्गावर एसटी बसेसच्या फे-या वाढविल्या होत्या. गतवर्षीच्या तुलनेने या वर्षी इचलकरंजी आगाराचे १० टक्क्यांनी उत्पन्न वाढ झाल्याची माहिती आगारप्रमुख सागर पाटील यांनी दिली.

Nashik News: मनमाड शहरात दाट धुक्याची चादर; कांदा रोपांना फटका बसण्याची शक्यता

नाशिकच्या मनमाड परिसरात काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे आज अचानक मोठ्या प्रमाणात धुके बघायला मिळाले. मात्र या धुक्यांमुळे कांदा रोपांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mumbai Live: दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशाचा स्वतःवर चाकूने वार

दादरच्या फलाट क्रमांक १२ वर प्रवाश्याने केले स्वतःवर चाकूने वार केल्याची घटना घडली. इतकेच नव्हे तर वार केल्यानंतर प्रवाशाने आत्महत्येचा प्रयत्न केला असून वेळीच फलाटावरील होमगार्डने प्रवाशाला अडवले. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे.

Live: हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा पक्ष प्रवेश सोहळा

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर,राष्ट्रवादी (शरद पवार गट ) चे माजी उपनगराध्यक्ष अविनाश नीलमवार यांच्यासह 20 माजी नगरसेवक, 8 विद्यमान नगरसेवक, 3 माजी नगराध्यक्ष आणि असंख्य कार्यकर्ते करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

Live: पुण्यातील दोन वर्षांच्या चिमुरडीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

मीरा भट्टड एक मिनिट सात सेकंदात सांगते अठरा राज्यांसह त्यांच्या राजधान्या

हडपसर येथील मीरा भट्टड या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरडीने केवळ एक मिनिट सात सेकंद इतक्या कमी वेळात अठरा राज्यांसह त्यांच्या राजधान्या सांगून सर्वांना अचंबित केले.

तीची ही हुशारी व कौशल्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून तीचा सन्मानपत्र व पदक देवून गौरव करण्यात आला आहे.

मीराची ही अचाट बुध्दीमत्ता व आकलनक्षमतेचे तसेच, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालीय.

Live: छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकेतील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक

युरोपियन लोकांना वेगवेगळी आमिष दाखवून गिफ्ट कार्ड वरून फसवणूक

१८० तरुण तरुणी एका कंपनीत काम करायचे

छत्रपती संभाजी नगर मधल्या चिकलठाणा एमआयडीसी मधील एका कॉल सेंटरवर पोलिसांनी टाकला छापा

सर्वजण नॉर्थ ईस्ट राज्यातील तरुण तरुणी

जवळपास १०० हून अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी एकत्र येऊन कारवाई सुरू

वर्षभरापासून सुरू होते कॉल सेंटर

अमेझॉन चे गिफ्ट व्हाउचर तुम्हाला मिळाले असल्याचे आम्हीच दाखवून करायची फसवणूक

Pune Live: पुणे जैन हॉस्टेल सुनावणी प्रकरणी अपडेट

ट्रस्टच्या वतीनेही व्यवहार रद्द करण्यास्तही अर्ज दाखल करण्यात येणार, सूत्रांची माहिती

गोखले ग्रुपने व्यवहार रद्द केल्यानंतर आता ट्रस्ट सुद्धा अधिकृत माघार घेणार असल्याची सूत्रांची माहिती

जैन बोर्डिंग संदर्भात धर्मदाय आयुक्त यांच्यासमोर सुनावणी सुरू

Karad Live: कराडच्या माजी नगराध्यक्षा शारदा जाधव भाजपामध्ये

जनशक्ती आघाडीच्या चार माजी नगरसेवकांसह केला भाजपा प्रवेश

आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली केला भाजपा प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत केला प्रवेश

शारदा जाधव यांच्या प्रवेशामुळे कराडच्या राजकारणाची समीकरण बदलणार

भाजपाची नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बेरीज

Santosh Deshmukh: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला

आरोपी वाल्मीक कराडच्या संपत्ती जप्तीबाबत आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली. सरकारी वकीलांनी वाल्मीक कराडची संपत्ती जप्त करण्याची मागणी केली आहे आणि पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला होणार आहे.

Nashik Live: १ नोव्हेंबरच्या मोर्चासाठी नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार तयारी

- मनसेने शहरात लावलेल्या बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा

- मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून चलो मुंबईचा नारा

- मतदार यादीतील घोळ आणि मत चोरी संदर्भातील मुद्द्यांवर मनसेचे बॅनर्स

- मोठ्या संख्येने मनसैनिक आणि शिवसैनिक मुंबईला नेण्यासाठी नियोजन

- या माध्यमातून मोठं शक्ती प्रदर्शन करण्याचा मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रयत्न

Jalgaon Live : जळगाव जिल्ह्यात कृषी केंद्रचालकांचं आंदोलन; ‘साथी पोर्टल’च्या विरोधात एक दिवस केंद्र बंद

जळगाव कृषी केंद्रांमधून बियाणे विक्री करण्यासाठी साथी पोर्टल वापरणे कृषी विभागाकडून बंधनकारक करण्यात येत आहे. मात्र ग्रामीण भागात हे पोर्टल वापरणे शक्य नसून अनेक विक्रेते बियाणांची हंगामी विक्री करत असतात. यामुळे साथी पोर्टल कंपनीस्तरावर लागू करावी. परंतु विक्रेत्यांसाठी नसावी या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्र एक दिवस कृषी केंद्र बंद ठेवत आंदोलन करण्यात असल्याची माहिती 'माफदा'चे अध्यक्ष विनोद तराळ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.राज्याच्या कृषी विभागाकडून मागील वर्षांपासून बियाणे उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या संनियंत्रणासाठी कंपन्या व घाऊक विक्रेते यांच्यासाठी साथी पोर्टल १ चा व किरकोळ विक्रेत्यासाठी साधी पोर्टल २ वापराची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कृषी विभागाकडून कार्यवाही सुरू आहे. मात्र साथी पोर्टल २ चा वापर करण्यासाठी राज्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील कृषी केंद्र चालकाकडे संगणक, प्रिंटर व स्कॅनर तसेच इंटरनेटची समस्या जाणवत असते. यामुळे ग्रामीण भागात याचा वापर करणे शक्य नाही.

Chh. sambhajinagar:छत्रपती संभाजीनगरामध्ये कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; फसवणुकीचा मोठा गोरखधंदा उघडकीस

छत्रपती संभाजी नगर मध्ये चिखलठाना भागत एका कॉल सेंटरवर संभाजीनगर पोलिसांनी छापा टाकलाय. या कॉल सेंटर मधून लोकांना फसवणुकीचे कॉल केले जात होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. गेल्या वर्षभरपेक्षा जास्त काळापासून हा सगळा गोरख धंदा येथे सुरू होता शंभर वर कर्मचारी या ठिकाणी काम करत होते होते, नक्की इथून कुठ कुठल्या देशात कॉल केले जात होते कसं लोकांना फसवण्यात येत होतं याची माहिती पोलीस देणार आहे तूर्तास कॉल सेंटरवर कारवाई सुरू आहे.

Nagpur Live :  मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर पोलिसांचा बंदोबस्त

- शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या इतर मागणीसाठी बच्चू कडू यांनी अमरावती ते नागपूर महाएल्गार मोर्चा काढला आहे. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर जाण्याचा इशारा दिला आहे....

- या पार्श्वभूमीवर परिसरातील रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर पोलिसांच्या बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

- कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, गरज पडल्यास हा पूर्ण रस्ता बंद करण्यासाठी बॅरिकेटिंग ची व्यवस्था ही पोलीस विभागाकडून करण्यात आलेली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून होईना मुख्यमंत्र्याच्या नागपुरातील शासकीय निवस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यासमोर बंदोबस्त आणि शहरातील इतर भागांमध्ये तसेच आंदोलन असलेल्या मार्गावर ही तगडा पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे..

Liveupdate: डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षाद्या, वडवणी तालुक्यात मोर्चा

डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी मोर्चा.

मोर्चाकरांनी मोर्चाचे रूपांतर केले रस्ता रोको आंदोलनामध्ये.

वडवणी तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन.

मोर्चेकर्‍यांनी वडवणी मध्ये बीड परळी मार्गावर रास्ता रोको आंदोलन

Hina Gavit liveupdate : माजी खासदार डॉ हिना गावित यांची आज घरवापसी...

हिना गावित यांचा आज होणार पुन्हा भाजपमध्ये प्रवेश...

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा उपस्थितीत हिना गावित यांचा भाजपमध्ये प्रवेश....

विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी अक्कलकुवा अक्राणी विधानसभेतून अपक्ष उमेदवारी केली होती....

निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पुन्हा भाजपमध्ये पक्षप्रवेश होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान...

RatnagiriLive Update : मोंथा चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट

अरबी समुद्रात देखील कमी दाबाचा पट्टा

अरबी समुद्र देखील असणार खवळलेला, जिल्ह्यात चौथ्या दिवशी पावसाची बरसात

मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता

किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहण्याची देखील शक्यता

ताशी 40 ते 45 किलोमीटर वेगाने वारे वाहणार

आज देखील मच्छीमारांना खोल समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये असं आवाहन

यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन

किनारपट्टी भागात सकाळपासून ढगाळ हवामान

काल रात्री देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

आणखीन दोन दिवस कोकण किनारपट्टी वरती पावसाची शक्यता

Jalgaon Live : एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी

एकनाथ खडसे यांच्या जळगावमधील घरामध्ये चोरी झाली आहे. खडसे कुटूंब दिवाळीत बाहेर गावी गेल्यामुळे घर बंद होते. त्यावेळी चोरांनी डाव साधला.

Pune Live :  जैन बोर्डिंग होस्टेलच्या व्यवहारातील २३० कोटींची गोठवा- रविंद्र धंगेकर

पुण्यातील जैन बोर्डिंग होस्टेलच्या सगळ्या ट्रस्टींना बरखास्त करा, अशी मागणी शिवेसना एकनाथ शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी केली आहे. जैन बोर्डिंग ट्रस्टच्या विक्रीमध्ये जी 230 कोटी रुपयांची रक्कम बिल्डर करून ट्रस्टला मिळालेली आहे, ती रक्कम गोठविण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Satara : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण, प्रशांत बनकरची पोलीस कोठडी आज संपणार

डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत बनकर यांची पोलिस कोठडी आज संपते आहे. फलटण न्यायालयाने 28 ऑक्टोबर पर्यंत बनकरला पोलिस कोठडी सुनावली होती. आज फलटण पोलिस प्रशांत बनकर ला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मात्र फलटण पोलिस पुन्हा प्रशांत बनकरची वाढवून पोलिस कोठडीची मागणी करणार का हे पहावे लागणार आहे.

Nagpur Weather Updates : नागपूरसह विदर्भात अवकाळी पावसाचं संकट, पुढचे ३ दिवस धोक्याचे

नागपूरसह विदर्भावर तीव्र अवकाळी पावसाचे संकट असून पुढील 3 दिवस विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात मोंथा चक्री वादळाचा विदर्भाला फटका बसू शकतो. अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडणार आहे. शेतात उभं असलेलं पीक पावसामुळे झोडपलं जाईल आणि यामुळे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com