पुणे

कृषिमंत्र्यांनी सोडले उजनीत मत्स्यबीज

CD

पळसदेव, ता. १५ : उजनी धरणातील मासेमारीवर प्रपंच अवलंबून असलेल्या मच्छीमारांच्या भविष्यातील हिताच्या दृष्टिकोनातून धरणात सुमारे सव्वा कोटी मत्स्यबीज सोडण्यास कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. पळसदेव (ता. इंदापूर) येथे आयोजित कार्यक्रमात भरणे यांच्या हस्ते बीज सोडण्यास प्रारंभ करण्यात आला.

यावेळी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे म्हणाले, मत्स्यबीज सोडण्यासाठी दोन कोटींची तरतूद करणारे नेते स्वर्गीय अजितदादा आपल्यात नसल्याचे दुःख सर्वांना आहे. मत्स्यबीज सोडण्यासाठी जिल्हा वार्षिक विकास प्रत्येक वर्षी तरतूद करत त्यांनी मत्स्यबीज सोडण्याच्या उपक्रमाची वहिवाट घालून दिली. यातून वेगवेगळ्या प्रजातीचे मत्स्यबीज उजनीत सोडले जाणार असल्याने, मच्छीमार बांधवांच्या रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लागला आहे.

यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, प्रतापराव पाटील, शरद बुट्टेपाटील यांसह पळसदेव, मदनवाडी, भिगवण येथील विविध संस्थांचे पदाधिकारी, पाटबंधारे, मत्स व्यवसाय विभागाचे अधिकारी व मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उजनीच्या विस्तीर्ण जलाशयावर जिल्ह्यात २२ सहकारी मच्छीमार संस्था कार्यरत आहेत. हजारो कुटुंबांचे प्रपंच मासेमारीवर अवलंबून आहेत. याशिवाय अहिल्यानगर जिल्ह्यातील मच्छीमारांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. आता सुनेत्रावहिनींनी कारभार स्वीकारला आहे. त्यांच्याकडून मच्छीमारांसाठी मोलाची मदत होणार आहे, असे मंत्री भरणे यांनी सांगितले.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर बाजार समितीत मासे खरेदी-विक्री सुरू केल्याने स्थानिक मच्छीमारांची चांगली सोय झाली आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उजनीच्या पाणलोटक्षेत्रात मत्स्यबीज सोडण्यात आले.


03393

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EOL Vehicle: जुन्या वाहनधारकांना मोठा धक्का! १० वर्षांची डिझेल, १५ वर्षांची पेट्रोल कार होणार थेट जप्त; राज्य सरकारचा कडक निर्णय

IND vs PAK :'हस्तांदोलन' न करणे हा भारताने सुरू केलेला मुर्खपणा! Sanjay Manjrekar यांची वादग्रस्त पोस्ट; काहींचा सपोर्ट, तर काही विरोधात; तुमचं काय मत?

Education: अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षणात मूलभूत सुधारणेसाठी तरतूद करा; महायुती सरकारकडे शिफारस

अनैसर्गिक शरीर संबंध, व्हिडिओ बनवला अन्...; ९ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं १२ वर्षीय मुलासोबत नको ते कृत्य, घटनेनं संताप

Latest Marathi News Live Update : जमिनीच्या वादातून हाणामारी, पोलिसांनी केली मध्यस्थी

SCROLL FOR NEXT