पुणे

उजनीच्या हिरवळीत ‘पट्टकादंब’ हंसाचा डेरा

CD

पळसदेव, ता. २६ : दरवर्षी नियमित उजनीच्या किनाऱ्यावर दाखल होणाऱ्या हंस प्रजातीतील ‘पट्टकादंब’ या पक्ष्यांनी यंदाही इंदापूर तालुक्यातील पाणलोटक्षेत्रात हजारोंच्या संख्येने हजेरी लावली आहे. या देखण्या पक्षांच्या डौलदार चालीचा थाट कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पर्यटक व पक्षी निरीक्षकांची पावले उजनीच्या किनाऱ्याकडे वळू लागली आहेत. उजनीच्या किनाऱ्यावरील हिरवळीवर या पक्ष्यांचे थवे सर्रास दिसून येत आहेत. एकीकडे पक्षांच्या गर्दीमुळे उजनीचा किनारा बहरलेला असताना, दुसरीकडे या नजाकतदार हंसाच्या थव्यांमुळे किनाऱ्याच्या सौंदर्यात भर पडली आहे.
हिवाळा सुरू झाला की उजनीच्या अथांग पाणलोटक्षेत्रात शेकडो प्रजातीचे परदेशी पक्षी हजारोंच्या संख्येने स्थलांतर करतात. निळ्याशार पाण्याचा अथांग विस्तार, त्याला हिरवळीची लाभलेली किनार आणि परिसराचे सौंदर्य खुलवणारे विविध प्रकाराचे पक्षी, असे हे नयनरम्य दृष्य पाहण्याची ओढ निसर्गप्रेमी, पर्यटक व पक्षी निरीक्षकांना स्वस्थ बसू देत नाहीत. सध्या उजनीचा काठ विविध प्रकारच्या पाणपक्षांनी फुलून गेला आहे. हे विहंगम दृष्य डोळ्यात साठविण्यासाठी पुणे, मुंबईसह परराज्यातील पर्यटक उजनीच्या पाणलोटक्षेत्रात दाखल होऊ लागले आहेत.
उजनीच्या किनाऱ्यावर दरवर्षी येणारे पक्षी निरीक्षक संदीप श्राॅफ म्हणाले, ‘‘गेल्या १४ वर्षांपासून या हंसांचे निरिक्षण करण्यासाठी आम्ही येथे असतो. जगातील सर्वांत उंचावरून उडणारे पक्षी म्हणून ओळखले जाणारे पट्टकादंब पक्षी प्रामुख्याने मध्य आशिया, तिबेट आणि मंगोलियाच्या भागात आढळतात. जेव्हा तिकडे कडाक्याची थंडी आणि बर्फवृष्टी सुरू होते, तेव्हा अन्नाच्या शोधात हे पक्षी हिमालय ओलांडून भारतात येतात. ताशी साधारण ८० ते १०० किमी वेगाने प्रवास करत हे पक्षी उजनीच्या उथळ पाण्यात दरवर्षी मुक्कामाला येतात. उजनीलगतच्या हिरवळीतील कोवळे अंकुर मटकन टिपत आपल्या पोटाची भूक भागवितात. दरम्यान त्यांचे देखणे रुप व डौलदार चाल पर्यटक व छायाचित्रकारांना आकर्षित करते.’’

उजनी जलाशयाचा विस्तीर्ण परिसरातील उथळ पाण्याच्या ठिकाणी मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या खाद्यान्नामुळे, हे पक्षी या ठिकाणी दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्याच्या दरम्यान दाखल होतात. धरणाचे पाणी कमी झालेल्या भागात या पक्ष्यांचे मोठे थवे पाहायला मिळत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील मका, गहू, हरभरा यांच्यासारख्या पिकांचे कोवळे अंकुर हे पक्षी खातात. यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना पिकांची राखण करावी लागते.
- दत्ता नगरे, क्रांती फ्लेमिंगो पाँईंटचे संस्थापक, कुंभारगाव

पर्वतशिखरांवरून उड्डाण करण्याची क्षमता
पट्टकादंब हंसवर्गीय पक्षी असून, दिसायला बदकासारखा असतो. याचा रंग प्रामुख्याने राखी-पांढरा असतो. मान लांब असून पाय पिवळ्या रंगाचे असतात. पांढऱ्या डोक्यावर काळ्या रंगाचे दोन समांतर पट्टे असतात, ज्यावरून याला ‘पट्टकादंब’ हे नाव पडले आहे. हिमालयासारख्या पर्वतशिखरांवरून (सुमारे २९,००० फूट उंचीवरून) उड्डाण करण्याची क्षमता असलेले हे पक्षी अत्यंत कमी ऑक्सिजन असलेल्या हवेतही वेगाने प्रवास करतात. याचे शास्त्रीय नाव ‘आन्सर इंडिकस’ असे असून याला ‘बार हेडेड गूज’ असेही संबोधले जाते. गवत, धान्य, कंद आणि पाणवनस्पती आदी या पक्षांचे खाद्य आहे.

कुंभारगाव (ता. इंदापूर) : उजनीच्या पाणलोटक्षेत्रात सध्या पट्टकादंब पक्ष्यांचे थवे पहायला मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घातपात, हलगर्जीपणा की गुन्हेगारी कृत्य... अजित पवारांच्या मृत्यूमागे नेमकं काय? पत्रकार परिषदेत सीआयडीनं कोणते संकेत दिले? वाचा...

हृदयस्पर्शी Video: फुटबॉल लागून 'SEAGULL' पक्षी कोसळला, खेळाडू त्वरित मदतीला धावला... CPR देऊन वाचवले प्राण...

Ajit Pawar Plane Crash: ''आम्हांला काही पुरावे सापडले आहेत'', अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी सीआयडीची पत्रकार परिषद

Explained : दक्षिण आफ्रिककडून वेस्ट इंडिजचा पराभव व्हावा, ही तर भारताची इच्छा! पण, का?

India Semi-Final Scenario: बापरे! भारताला तब्बल २९० धावांनी झिम्बाब्वेला हरवावं लागेल? नेमकं कसं आहे गणित, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT