पुणे

पाटसला अहिल्यादेवी होळकर स्तंभाचे अनावरण

CD

कानगाव, ता. १ : पाटस (ता. दौंड) येथे अष्टविनायक महामार्गावर पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये होळकर यांच्या स्तंभाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. स्वप्नील भागवत म्हणाले, ‘‘अहिल्यादेवी होळकर या एक आदर्श राज्यकर्त्या, समाजसुधारक आणि न्यायप्रिय शासक म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि कुशल प्रशासनामुळे त्यांनी आपल्या राज्याचा सर्वांगीण विकास केला. मंदिरांचा जीर्णोद्धार, धर्मशाळांचे बांधकाम, पाणी योजनेची अंमलबजावणी यासारखे कार्य त्यांनी केले.’’
योगेंद्र शितोळे म्हणाले, ‘‘अहिल्यादेवी यांनी फक्त एका समाजाला नाही तर संपूर्ण भारताला पुढे घेऊन जाण्याचे कार्य केले. सर्वांना समान न्याय दिला. सर्वधर्म समभाव जपला आहे.’’
या प्रसंगी पाटस सत्वशील शितोळे, विकास कोळपे, बाबा कोळेकर, दादा केसकर, संभाजी खडके, तानाजी केकाण, दादा भंडलकर, शिवाजी ढमाले, मोहन बिचकुले, अक्षय सुळ, विशाल साळुंके, अरुण भागवत, संभाजी देशमुख, मधुकर आव्हाड, अभिजित शितोळे, सागर शितोळे पाटील, अमोल भागवत, प्रवीण गरदडे, सतीश आव्हाड, शिवराज तोंडे पाटील उपस्थित होते. दादा केसकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात मोठी दुर्घटना! १० फूट खड्ड्यात कंटेनर कोसळला, चालकाची सुखरूप सुटका

Pune Farmers Protest: मीना नदीतील जलसमाधी आंदोलनाला तहसीलदारांचे आश्वासन; पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी संयुक्त बैठक ठरणार

CJP Protest: दिल्लीत पुन्हा पेटणार आंदोलन? पोलिसांनी गुन्हे मागे न घेतल्याने नव्या आंदोलनाचा इशारा

शब्दांनी मनात वादळ उठलं, एका व्हिडिओने देशाला विचार करायला भाग पाडलं, जंतरमंतरवरचा मोहम्मद इरफान नेमका कोण?

Latest Marathi News Live Update: लोकसभेत 'सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक, २०२६' वरील चर्चेसाठी एकूण ८ तासांचा वेळ निश्चित

SCROLL FOR NEXT