पुणे

भाजपच्या विधानसभा कार्यालयाचे लोणीकंद येथे आज उद्‌घाटन

CD

केसनंद, ता.७ : पुणे-नगर रस्त्यावरील लोणीकंद (ता. हवेली) १२ वा मैल येथे भारतीय जनता पक्षाच्या शिरूर-हवेली विधानसभा कार्यालयाचे उद्‌घाटन उद्या (ता. ८) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
उद्‌घाटनप्रसंगी बावनकुळे यांच्यासह त्र्यंबकेश्वर येथील आनंद आखाड्याचे गुरुवर्य श्री महंत गिरीजानंद सरस्वती महाराज तसेच पुणे शहर व जिल्ह्यातून भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे हवेली तालुकाध्यक्ष पहिलवान संदीप भोंडवे व शिरूर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी सांगितले. सुमारे साडेतीन हजार चौरस फुटांच्या या मध्यवर्ती कार्यालयात अत्याधुनिक सर्वसोयी सुविधा असल्याने येत्या काळात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अधिक प्रभावी संघटनात्मक कामकाज करता येणार असल्याचा विश्वास जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT