पुणे

लोणीकंदला मोटारसायकल रॅली काढून निषेध

CD

कोरेगाव भीमा, ता. २६ : पहलगाम येथे पर्यटकांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पेरणे येथील संत तुकाराम स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेच्या वतीने पेरणे-लोणीकंद-पेरणे फाटा-कोरेगाव भीमा-वढू ते डिंग्रजवाडी चौक अशी मोटारसायकल रॅली काढून या भ्याड हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध करण्यात आला.
प्रबोधन केंद्र व स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे संस्थापक उत्तमराव भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा ध्वजासह काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये पेरणे, लोणीकंद, कोरेगाव भीमा, वढू व डिंग्रजवाडीसह पंचक्रोशीतील अनेक पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते.
हल्यात महाराष्ट्रातील सहा जणांसह २६ पर्यटकांचा गोळीबाराने मृत्यू झाला. ही अत्यंत दुर्दैवी व भारतीय नागरिकांच्या मनात चिड आणणारी घटना आहे. या घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करणे, तसेच या घटनेचे केंद्र सरकारने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यावे, त्यासाठी भारतीय सैनिकांचे मनोधैर्य वाढविणे तसेच समाजात एकजुटीबाबत जनजागृती करणे या उद्देशाने ही रॅली काढण्यात आल्याचे भोंडवे यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देत देशाला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. तर लोणीकंदमध्ये मारुती मंदिर व ग्रामपंचायत चौकात लोकनायक जय प्रकाश नारायण ज्येष्ठ नागरिक संघाच्या काही सदस्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या.
04899

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाणी वाचवा! एक लीटर पाण्यात अंघोळ, RSSच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देत असल्याचा VIDEO VIRAL

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Solapur Vidhansabha BJP: सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपचा सस्पेन्स कायम; उमेदवारीवरून भाजपमध्ये चुरस, कोणाला मिळणार संधी?

Pune Medical College: दोन तासांचे काम; महिन्याचा दाम, पुण्यातील अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांचा अनोखा फंडा

"आमिर आणि माझ्या नात्याला नाव मिळालं नाही" पूजा भट्टचा धक्कादायक खुलासा; नात्याबद्दल म्हणाली..

SCROLL FOR NEXT